29.8 C
Gondiā
Sunday, June 14, 2026
Home Top News अशोकस्तंभाचे सिंह बदलल्याचा आरोप:108 फूट उंच नव्या संसद भवनवर राष्ट्रीय चिन्हाचे 150...

अशोकस्तंभाचे सिंह बदलल्याचा आरोप:108 फूट उंच नव्या संसद भवनवर राष्ट्रीय चिन्हाचे 150 तुकडे जोडण्यास लागले 2 महिने

0
34

blank

6.5 मीटर लांब, 9500 किलो वजन आणि आधार देण्यासाठी 6500 किलोग्रॅम स्टील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 जुलै रोजी उद्घाटन केलेल्या नव्या संसद भवनाच्या वर स्थापन करण्यात आलेल्या अशोक स्तंभाजी ही वैशिष्ट्ये आहेत. 1200 कोटी रुपये खर्चून उभारल्या जात असलेल्या नवीन संसद भवनाचे बांधकाम या वर्षाच्या अखेरीस किंवा 2023 च्या सुरुवातीला पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

नवीन संसद भवनावर बांधण्यात आलेल्या अशोक स्तंभाची वैशिष्ट्ये काय आहेत हे या एक्सप्लेनरमध्ये जाणून घ्या. त्याच बरोबर, यावर विरोधक का प्रश्न उपस्थित करत आहेत? आपल्या राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभाची कथा काय आहे? हे देखील.. वाचा.

सर्वप्रथम, नवीन संसद भवनावर स्थापित करण्यात आलेल्या अशोक स्तंभाची वैशिष्ट्ये काय आहेत, हे ग्राफिक्समध्ये जाणून घ्या.

blank

संसदेच्या नवीन इमारतीवर बसवलेल्या अशोकस्तंभाने 8 टप्पे पार केले

1. अशोक स्तंभ, नवीन संसद भवनाच्या छतावरील राष्ट्रीय चिन्ह, ब्राँझचे बनलेले आहे, त्याचे वजन 9500 किलो आहे आणि त्याची लांबी 6.5 मीटर आहे.

2. त्याच्याभोवती स्टीलची एक आधारभूत रचना तयार केली गेली आहे, ज्याचे वजन सुमारे 6500 किलो आहे.

3. या अशोक स्तंभाची संकल्पना आणि नवीन संसद भवनाच्या छतावर त्याची स्थापना करण्याची प्रक्रिया आठ टप्प्यांतून गेली आहे.

4. प्रक्रिया क्ले मॉडेलिंग आणि संगणक ग्राफिक्सपासून कांस्य कास्टिंग आणि पॉलिशिंगपर्यंतची आहे.

5. प्रथम, या प्रकल्पात सहभागी असलेल्या वास्तुविशारद आणि ग्राफिक डिझायनर्सनी संगणक ग्राफिक स्केच तयार केले. यानंतर ग्राफिक स्केचवर आधारित क्ले मॉडेल बनवले.

6. केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग अर्थात CPWD च्या सल्ल्यानुसार, कांस्य धातूपासून बनवलेल्या राष्ट्रीय चिन्हाची प्रारंभिक संकल्पना अहमदाबादच्या हसमुख सी पटेल यांनी तयार केली होती.

7. त्यानंतर, टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड आणि औरंगाबादच्या सुनील देवरे यांनी माती आणि थर्माकोलचे मॉडेल विकसित केले.

8. हा अशोक स्तंभ बनवण्याची उर्वरित प्रक्रिया जयपूर आणि दिल्ली येथे लक्ष्मण व्यास यांच्या नेतृत्वाखाली तज्ञ कारागिरांनी पूर्ण केली.

9. हा अशोक स्तंभ तयार करण्यासाठी 100 हून अधिक कारागिरांनी 9 महिन्यांहून अधिक काळ काम केले.

10. नवीन संसद भवनाच्या छतावर हे चिन्ह घेऊन जाणे अत्यंत आव्हानात्मक होते, कारण ते जमिनीपासून 33 मीटर उंचीवर आहे, जे सुमारे 108 फूट उंच आहे. यासाठी चिन्हाची 150 तुकड्यांमध्ये विभागणी करण्यात आली आणि नंतर हे सर्व तुकडे छतावर एकत्र करण्यात आले. त्याचे 150 तुकडे एकत्र करण्यासाठी सुमारे दोन महिने लागले.

11. हे प्रतीक उच्च प्रतीच्या कांस्यांपासून बनवले आहे. हे पूर्णपणे भारतीय कारागिरांनी हाताने बनवलेले आहे.

12. अशोक स्तंभाची अशी कलाकृती, कारागिरी आणि साहित्याचा झालेला वापर भारतात अन्यत्र कुठेही करण्यात आलेला नाही.

13. हे मॉडेल अशोक स्तंभाची प्रतिकृती आहे. वास्तविक, अशोक स्तंभ किंवा अशोक चिन्ह हे भारताचे राष्ट्रीय प्रतीक आहे. हे सारनाथ येथील ‘अशोक की लाट’ किंवा ‘लायन कॅपिटल ऑफ अशोक’ मधून घेतले आहे.

14. भारताचे राष्ट्रीय चिन्ह 26 जानेवारी 1950 रोजी स्वीकारले गेले, त्याच दिवशी देशाची राज्यघटना लागू झाली.

 

मूळ अशोक स्तंभ सारनाथच्या संग्रहालयात जतन केलेला आहे. भारतीय राष्ट्रीय चिन्हाचे ब्रीदवाक्य ‘सत्यमेव जयते’ आहे, ज्याचा अर्थ ‘केवळ सत्याचा विजय होतो’ असा आहे. हे वाक्य अशोक स्तंभाच्या तळाशी लिहिलेले आहे.

आता यावर विरोधक प्रश्नचिन्ह का उपस्थित करत आहेत? ते जाणून घेऊया…

संसदेच्या नवीन इमारतीच्या छतावरील राष्ट्रचिन्हात सिंह बदलले असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. एक ट्विट शेअर करत आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, मला 130 कोटी भारतीयांना विचारायचे आहे की, राष्ट्रचिन्ह बदलणाऱ्यांना देशविरोधी म्हणायचे का नाही?

blank

तृणमूल काँग्रेसचे खासदार जवाहर सरकार आणि महुआ मोईत्रा यांनी संसदेच्या नवीन इमारतीच्या वरच्या बाजूला बसवण्यात आलेल्या अशोक स्तंभाचे सिंह योग्य प्रकारे तयार करण्यात आलेला नसल्याने मोदी सरकारवर टीका केली आहे. या अशोकस्तंभाचे सिंह ‘आक्रमक’ आणि ‘ओबडधोबड’ पद्धतीने दाखविण्यात आल्याचा आरोप सरकार आणि मोईत्रा यांनी केला आहे.

राज्यसभेचे खासदार, सरकार यांनी ट्विट करत लिहिले की: ‘आमच्या राष्ट्रीय प्रतीकाचा, अशोक सिंहांचा अपमान. खरा अशोक स्तंभा डाव्या बाजूचा. सुंदर, आत्मविश्वास दिसणारा. तर उजवीकडचा मोदींची नवी आवृत्ती, ज्याला संसदेीच्या नव्या इमारतीवर लावण्यात आले आहे. चीडलेला, विनाकारण आक्रमक झालेला. लाज वाटू द्या! ताबडतोब बदला!’

blank
blank

यासोबतच संसदेच्या नवीन इमारतीवर बसवण्यात आलेल्या अशोक स्तंभाबाबत सोशल मीडियावरही चर्चेला उधाण आले आहे. सारनाथ संग्रहालयातील अशोक स्तंभाचे मूळ स्वरूप आणि आता नवीन संसद भवनात स्थापित केलेला अशोक स्तंभ यांच्यातील फरकाची छायाचित्रे अनेक लोक ट्विट करत आहेत आणि शेअर करत आहेत.

आता या अशोक स्तंभाचे ऐतिहासिक महत्त्व पाहा

सारनाथमध्ये उभारल्या गेलेल्या अशोकस्तंभाची कथाही खूप रंजक आहे. ईसापूर्व 273 मध्ये, भारतावर मौर्य वंशाचा तिसरा राजा सम्राट अशोक याने राज्य केले. सुरुवातीला सम्राट अशोक हा अत्यंत क्रूर शासक मानला जात होता, परंतु कलिंग युद्धातील हत्याकांडाने त्याला पूर्णपणे बदलून टाकले.

याचा परिणाम असा झाला की, त्यांनी राज्याचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारला. इथेच अशोकस्तंभ बांधायला सुरुवात झाली. सम्राट अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर त्याचा प्रचार करण्यास सुरुवात केली. सारनाथच्या अशोक स्तंभासह 3 वर्षांच्या कालावधीत त्यांनी 84,000 स्तूप बांधले. अशोक स्तंभ ईसापूर्व 250 मध्ये बांधण्यात आले.

स्वातंत्र्यानंतर भारताचे राष्ट्रीय चिन्ह म्हणून याच अशोक स्तंभाचा स्वीकार करण्यात आला

जाणून घ्या अशोक स्तंभातील 4 सिंहांच्या वापराची कहाणी

अशोकस्तंभात सिंहांचा समावेश करण्यामागची कथा रंजक आहे. भगवान बुद्धांना सिंहाच्या समान मानले जाते. बुद्धाच्या शंभर नावांमध्ये शाक्य सिंह, नर सिंह या नावाचाही समावेश आहे. याशिवाय सारनाथमध्ये भगवान बुद्धांनी दिलेल्या उपदेशाला सिंहगर्जना असेही म्हणतात, त्यामुळे बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी सिंहांला महत्त्व देण्यात आले.

भारताचे राष्ट्रीय चिन्ह सम्राट अशोकाची राजधानी सारनाथ येथील अशोक स्तंभावरून घेतले आहे. अशोक स्तंभाच्या शिखरावर 4 आशियाई सिंह आहेत, जे एकमेकांकडे पाठ करुन उभे आहेत. हे चारही सिंह शक्ती, धैर्य, विश्वास आणि अभिमान यांचे प्रतिक आहेत.

राष्ट्रीय चिन्हात 4 सिंह असले तरी गोलाकार आकारामुळे प्रत्येक कोनातून पाहिल्यास केवळ 3 सिंह दिसतात. याशिवाय खांबावर घोडा, बैल, हत्ती आणि सिंह यांचेही चित्रे आहेत. एकाच दगडावर कोरीव काम करुन या सिंहस्तंभाच्या वर धम्मचक्र बसवले आहे.

सर्व अशोक स्तंभांना चुनार आणि मथुरेतील दगड वापरून येथील कारागिरांनी कोरले होते. राष्ट्रीय चिन्हाखाली मुंडकोपनिषद मधील सूत्र ‘सत्यमेव जयते’ हे देवनागरी लिपीत लिहिलेले आहे.

सारनाथ येथील अशोक स्तंभाचे 1904-1905 च्या सुमारास, ते राष्ट्रीय चिन्ह बनण्यापूर्वीचे छायाचित्र. स्वातंत्र्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी हा स्तंभ भारताचे राष्ट्रीय चिन्ह बनला.
सारनाथ येथील अशोक स्तंभाचे 1904-1905 च्या सुमारास, ते राष्ट्रीय चिन्ह बनण्यापूर्वीचे छायाचित्र. स्वातंत्र्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी हा स्तंभ भारताचे राष्ट्रीय चिन्ह बनला.

अशोक स्तंभाच्या वापराशी संबंधित कायदेशीर नियम पाहूयात…

राष्ट्रीय चिन्ह हे भारताचे राष्ट्रपती आणि केंद्र आणि राज्य सरकारचा अधिकृत शिक्का आहे. आणि भारत सरकारच्या अधिकृत लेटरहेडवरील एक अनिवार्य भाग आहे.

राष्ट्रीय चिन्ह सर्व भारतीय चलने आणि पासपोर्टचा एक भाग आहे. भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी म्हणजेच IPS अधिकाऱ्यांच्या टोपीवर राष्ट्रीय चिन्ह असते.

‘स्टेट अ‍ॅम्ब्लेम ऑफ इंडिया अ‍ॅक्ट 2005’ अंतर्गत राष्ट्रीय चिन्हाचा वापर करण्यास मनाई आहे. या अंतर्गत खासगी व्यक्ती किंवा संस्था पत्रव्यवहारासाठी याचा वापर करू शकत नाही.

कोणत्या सरकारी इमारतींवर वापर करता येईल

राष्ट्रपती भवन

संसद भवन

सर्वोच्च न्यायालय

केंद्रीय सचिवालयाची इमारत

राजभवन

उच्च न्यायालय

राज्य सचिवालयाची इमारत

भारतीय दूतावास