35.5 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home विदर्भ एग्रो डीलर संघटनेने दिले जि.प. कृषी अधिकार्‍यांना निवेदन

एग्रो डीलर संघटनेने दिले जि.प. कृषी अधिकार्‍यांना निवेदन

0
35

blank

गोंदिया दि.11: केंद्र शासनाने कीटक नाशके व खते विक्री करण्यासाठी परवान्याची मागणी करणार्‍या व परवानाधारक असणार्‍या व्यक्तींच्या शैक्षणिक अर्हतेविषयी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. सदर अधिसूचना रद्द करण्यासाठी जिल्हा एग्रो डीलर संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी जि.प. कृषी विकास अधिकारी यांना निवेदन दिले आहे.
निवेदनानुसार, सदर अधिसूचना रद्द करण्यासाठी महाराष्ट्र फर्टिलायझर्स तसेच पेस्टीसाईड व सीड्स डीलर असोसिएशन पुणे यांच्या आवाहनानुसार शनिवारी जिल्ह्यातील सर्व कृषी विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवून सदर अधिसूचनेचा निषेध केला. बंदबाबत मोर्चा न काढता शांततेच्या मार्गाने जिल्हा संघटनेचे पदाधिकारी व कृषी विक्रेत्यांनी निवेदन सादर केले.
कृषी विक्रेत्यांवर झालेला अन्याय थांबविण्यात न आल्यास आंदोलन करण्याचा इशारासुद्धा त्यांनी दिला आहे.

blank