33.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ पुरग्रस्त पीडितांना नुकसानीप्रमाणे पंचनामे करून १०० टक्के मदद द्या – आ.विनोद अग्रवाल

पुरग्रस्त पीडितांना नुकसानीप्रमाणे पंचनामे करून १०० टक्के मदद द्या – आ.विनोद अग्रवाल

0
26

blank

गोंदिया-जिल्ह्यामध्ये मागील १५ दिवसापासून सातत्याने २०० टक्के पाउस पडला आहे व या अतिवृष्टी पावसामुळे यंदा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत अनेक रस्ते व पुलांची अवस्था फारच दयनीय तसेच अनेक घरांची पडझड़ तसेच शेतपिकाचे पूर्णपणे नुकसान झालेले आहे व अनेक गावाशी अतिवृष्टी पावसामध्ये संपर्क पूर्णपणे तुटला होता त्यामुळे संपर्क झाला नव्हता या साठी आ.विनोद अग्रवाल यांनी तालुका कृषि अधिकारी, गटविकास अधिकारी, पंचायत समिति सभापति व सर्व तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, ग्राम पंचायत सदस्य तसेच कृषि सहायकांच्या उपस्थिति मध्ये बिरसोला, उधईटोला, पुजारीटोला, कासा, मरारटोला, तेढवा, बडगांव, कटंगटोला, छिपिया या गावामध्ये भेट देता गावपातळीवर कार्यरत असलेल्या अधिका-यांना नुकसानीचे पंचनामे करण्यात आले की नाही तसेच चावड़ी वाचन करून उरलेले पंचनामे करा व जे नुकसान झालेले आहे त्यांचे उल्लेख करा व कुणीही लाभापासून वंचित राहू नये व ग्राम पंचायतीमध्ये नुकसानग्रस्तांची यादी जाहिर करा याची दक्षता घ्यावी असे निर्देश दिले तसेच अनेक पुरग्रस्ताकडून चुकीचे स्वयंघोषणापत्र अर्ज भरून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचे कार्य सुरु आहे ते थांबविण्यात यांवे व या संबधी जिल्हाधिकारी यांना केली.

या दरम्यान आ.विनोद अग्रवाल, तालुका कृषि अधिकारी,तुमडाम, गटविकास अधिकारी चौरागढ़े, पंचायत समिति सभापति मुनेश रहांगडाले, भाउराव उके जेकेपी जिल्हाध्यक्ष, छत्रपाल तुरकर तालुकाध्यक्ष जेकेपी, अनंदा वाढीवा जिप सदस्या, काटी, चेतन बहेकार, सत्यम बहेकार, सुरपत खैरवार, भरत जमरे प.स.सदस्य, शिवलाल जमरे पस.सदस्य  व अनमोल उके, मिथुन पाचे, रमेश नागफासे, सर्व तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, ग्राम पंचायत सदस्य,पोलीस पाटील, कोतवाल तसेच कृषि सहायकांच्या इत्यादि यावेळी उपस्थित होते.

blank