
गडचिरोली- जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालये सत्र २०२२ – २०२३ चे सत्र सुरू होऊन दोन महिने पूर्ण झाली.अजून पर्यंत जिल्ह्यातील आदिवासी वसतिगृह सुरू झालेले नाही. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. करीता जिल्ह्यातील सर्व वसतिगृह सुरू करण्याबाबत माजी आमदार डॉ नामदेवराव उसेंडी यांनी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांची भेट घेऊन आदिवासीच्या विविध समस्या बाबत चर्चा केली.
या चर्चेत मागील सत्रातील विद्यार्थ्यांच्या शालेय व महाविद्यालयीन गणवेशाची रक्कम त्वरित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावे, नामांकित शाळेतून दहावी वर्ग पास झालेल्या विद्यार्थ्यांचे पुढील वर्ग ११ वी वर्गात प्रवेश देण्यात यावे, आदिवासी वसतिगृहाची डीबीटी योजना बंद करण्यात यावे. आदिवासीच्या विविध समस्यासह आदिवासीच्या सर्वांगीण विकास कसा करता येईल आदी मुद्यावर चर्चा केली.




