
जागतिक महिला समानता दिनानिमित्त..
गोंदिया:- महिलांवर होणारे अत्याचार विरोधात आंतरराष्ट्रीय महिला समानता दिन प्रित्यर्थ सर्वसमाज महिला सुरक्षा जनजागृती अभियान ( 28 ऑगस्टला) प्रशासकीय भवन, डॉ. आंबेडकर प्रतिमा चौक परिसर, गोंदिया येथे घेण्यात आले. सर्वसमाज विचार महोत्सव समिति अध्यक्ष प्रा.डॉ. दिशा गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांवर सतत होत असलेल्या अत्याचार विरोधात 30 सामाजिक संघटना व विद्यार्थी, सर्वसमाज विचार महोत्सव समिति, निर्भया गोंदिया ग्रुप या मंचाखाली एकत्रित येऊन महिला सुरक्षा विषयी जनजागृती अभियानात सहभागी होत चिंतन केले.
सर्वसमाज महिला सुरक्षा जनजागृती अभियान कार्यक्रमाची सुरुवात संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून तसेच सर्वसमाज नागरिकांना समता, न्याय, बंधुता शिकवीणाऱ्या भारतीय संविधान प्रस्ताविका वाचन करून करण्यात आली. तदनंतर डॉ. स्वेतल व संजय माहूले यानी गोरेगाव तालुक्यातील अत्याचार पीडितावर होत असलेल्या वैद्यकीय उपचार तपासणीतुन पीड़ित महिलेच्या आंतरिक शरीरावर केलेल्या इज़ा, आरोपी नराधमाद्वारे माणुसकीला लाज वाटेल अशा घड़लेल्या प्रकरणाचे गांभीर्य सर्वांसमोर मांडले. त्यांच्या माध्यमातून गोंदिया मेडिकल कॉलेज विद्यार्थ्यानी गर्भावस्थेत असल्यापासुन मोठी झाल्यावर समाजात वावरत असताना तिच्यावर नाना प्रकार होत असलेल्या अत्याचारचे चित्रण व त्यावर उपाय योजना यावर पथनाट्य प्रस्तुत केले.एनएमडी कॉलेज येथील विद्यार्थिनी अलीशा चौहान हिने गोरेगाव तालुक्यातील पीड़ित महिलेवर झालेल्या अघोरी कृत्याचे एकांकिकेच्या माध्यमातून तर गर्ल्स कॉलेज येथील विद्यार्थिनी माधुरी भोयर हिने बिलकिस बानो यांच्यावर तर आकांक्षा तुरकर हिने एका लहान मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या यातना काव्य शब्दातुन व्यक्त केल्या. महिला अत्याचार निवारण महिला सुरक्षा जागृती, संविधानिक अधिकार कायदा या विषयावर गर्ल्स कॉलेज येथील विद्यार्थिनीनी पोस्टर प्रदर्शनी आयोजित केली. कमांडर किरण वासनिक यांच्या नेतृत्वात समता सैनिक दलाचे सलामी व पथसंचालन घेण्यात आले.
पोलिस प्रशासन गोंदिया तर्फे अशा घटना घडू नये महिला सुरक्षेकरिता संरक्षण मदत, सरकारी यंत्रणा, योजना, व दक्षता टोल फ्री नं. याची माहिती पोलिस विभाग भरोसा सेलच्या एपीआय स्नेहा लांडेने दिली. या प्रसंगी शासनातर्फे वन स्टॉप क्राईसेस सेंटरच्या केंद्र प्रमुख समीना खान, बाल विकास प्रकल्प विस्तार अधिकारी तीर्थराज उके उपस्थित होते.
लोधी समाज सेवा समिती तर्फे संयोजक देवेंद्र मच्छिरके , कृष्णा गएगये, लोधी नारी शक्ति संघटन संयोजक मनिषा बाबा अटरे, अवंतीबाई लोधी बहुदेशीय संस्था संयोजक अशोक नागपुरे, खेमलाल माहुले उपस्थित होते.
गोंदिया मुस्लिम जमात संघटन तर्फे खालिद पठान आणि नगमा शेख यानी बिलकिस बानो व सतत होत असलेल्या अत्याचार विरोधात भाष्य केले.ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळ तर्फे वसंत गवळी,ओबीसी सेवा संघाचे सि पी बिसेन , जेसीआईचे पुरुषोत्तम मोदी ,प्रा. माधुरी नासरे , महिला जनप्रतिनिधि म्हणून भावना क़दम,आदिवासीं समाज प्रतिनिधि म्हणून शुभम आहाके,ओबीसी संघर्ष कृती समितितर्फे माधुरी कैलाश भेलावे, युवा बहुजन मंचच्या रिना सुनील भोंगाड़े, रवि भांडारकर, मराठा सेवा संघाचे सुनील तरोने, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्व. सामाजिक जयंती उत्सव समिति अध्यक्ष सविता उके, मातंग समाज संघाचे प्रा.धर्मवीर चौहान, सशक्त नारी संगठन, महिला मुक्ति मोर्चाचे शिखा पिपलेवार, जनशक्ति सामाजिक संघटन, सर्ववर्गीय कलार समाज संघटना, सर्वसमाज ओबीसी मंच, युवा कोसरे कलार समाज संस्था, अखिल भारतीय कलार कलाल कलवार महिला संगठन,आधार महीला शक्ती संघटन आदिंचे सहकार्य लाभले.
आयोजनासाठी सर्वसमाज विचार महोत्सव समितिच्या अध्यक्ष प्रा.डॉ. दिशा गेडाम,आरती पारधी, शीतल कुंभारे, वरिष्ठ वसंत गवळी, सि पी बिसेन,राजीव ठकरेले, हर्षल पवार, तीर्थराज उके, कैलाश भेलावे, सुनील भोंगाड़े, रवि भांडारकर आदिनी सक्रिय प्रयत्न केले.
▪️अभियान कार्यक्रमात बिजिडब्ल्यू ब्लड बैंक तर्फे अनिल गोंडाने, प्रा.रोमेंद्र बोरकर, ऋतु तुरकर, आदेश गणवीर, दयाराम तिवळे, अमित पृथ्यानी, राजेश कनोजिया, हमीदभाई मेमन, फरहान कच्छी, प्रा.प्रल्हाद हरड़े, भाविका बघेले, पूजा तिवारी, वंदना काळे, धर्मिष्ठा सेंगर, लता बाजपेयी, लक्ष्मी राउत, पंचशीला पाणतवने, नीलकंठ चिचाम आदि सामाजिक क्षेत्रातील मंडळीनी उपस्थिती दर्शवली.




