
ग्राहकाची जोडणी कापल्याचे प्रकरण : वीज अभियंता रामनगर पोलीस ठाण्यावर धडकले
गोंदिया,दि.29ः लगतच्या ग्राम मुर्री येथील एका ग्राहकाची वीजजोडणी कापली या प्रकरणाला घेऊन रागावलेल्या आमदार विनोद अग्रवाल यांनी ग्रामीण उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता राजेश कंगाले यांच्या कानशिलात लगावली.
सोमवारी (दि.२९) सायंकाळी ५ वाजता दरम्यान सूर्याटोला उपविभाग कार्यालयात ही घटना घडली.या घटनेनंतर
समस्त वीज अभियंत्यांनी रामनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविण्याची मागणी केली.
वीज अभियंत्यांनी दिलेल्या माहितीनुसार,लगतच्या ग्राम मुर्री निवासी लारोकर यांच्यावर ११,००० रुपयांचे वीजबिल
असून यासाठी वीज अभियंता शुक्रवारी त्याच्याकडे गेले होते.यावर त्याने सोमवारी (दि .२९) बिल भरतो असे म्हणत
वेळ मागितली.मात्र सोमवारी बिलाच्या रकमेतील ४००० रुपये भरतो व उर्वरित रक्कमनंतर भरणार असे म्हटले.यावर त्याची वीजजोडणी कापण्यात आली.या प्रकरणाला घेऊन आमदार अग्रवाल महावितरणच्या सूर्याटोला येथील
उपविभाग कार्यालयात गेले व तेथे उपस्थित असलेल्या उपकार्यकारी अभियंत्यांना एक-दोन नव्हे तर तब्बल पाच
झापड मारल्या.याप्रकारामुळे संतापलेल्या वीज अभियंत्यांना लगेच रामनगर पोलीस ठाणे गाठून आमदारांविरोधात गुन्हा दाखल करण्या ची मा गणी केली . तसेच या घटनेला घेऊन अभि यंत्यां नी असहका र आंदो लन सुरू केले असून, गुन्हा दाखल होतपर्यंत आंदोलन सुरू राहणार व त्यात दरम्यान काही समस्या आल्यास त्यासाठी जबाबदार राहणार नाही अशा
इशारा दिला आहे. वृत्त लिहेपर्यंत रामगनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नव्हता यावरुन पोलिसांची कार्यवाहीही जनतेच्या मनात शंका निर्माण करणारी ठरली आहे.
गोंदिया विधानसभा मतदारसंघातील आमदार विनोद अग्रवाल यांच्या चाबी संघटनेचे व भाजपचेही काही नेते रामनगर पोलिस ठाण्यात दाखल झाले असून विज वितरण कंपनीचे अधिकारी तसेच पिडीत अंभियता व आमदार यांच्यात चर्चा सुरू असून आपसात हे प्रकरण संपवून सदर प्रकरणात गुन्हा दाखल होऊ नये याकरीता वाटाघाटी करीत असल्याचे वृत्त रामनगर पोलिस ठाणे परिसरात होते.ज्या अभियंत्याला मारहाण करण्यात आली,ते आदिवासी समाजातील अंभियते असल्याचे वृत्त आहे.विशेष म्हणजे भाजपच्या काही आमदाराचें खास व्यक्ती रामनगर पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत.
दरम्यान आमदार विनोद अग्रवाल यांच्याशी बेरार टाईम्स प्रतिनिधींनी चर्चा केली असता गेल्या अनेक महिन्यापासून विजेचे भारनियमन नसतानाही भारनियमन केले जात आहे.त्यासंदर्भातही अनेकता बोलण्याचा प्रयत्न केला परंतु उत्तर व्यवस्थित दिले गेले नाही.आज जेव्हा संबधित ग्राहक आपल्या कार्यालयात आला तेव्हा माझ्या स्वीय सहायाने अभियंत्यांशी बोलणी करुन ग्राहक जेवढे पैसे भरत आहे तेवढे घेत 8 दिवसात उर्वरित पैसे भरत असल्याचे सांगण्यात आले.मात्र त्यानी एैकले नाही,त्यामुळे मी विज वितरण कार्यालयात गेलो आणि तिथे कार्यकारी अभियंत्यांशी चर्चा करीत अभियंत्याला समज देण्याचा प्रयत्न केला.मी लोकप्रतिनिधी असून मला जनतेच्या समस्या सोडवयाच्या असल्यानेच मी माझी भूमिका मांडल्याचे आमदार विनोद अग्रवाल यांनी सांगितले.अधिकारी आपल्या पदाचा गैरवापर करीत जनतेला त्रास देत असल्याचे सागंत जर कुठला ग्राहक अर्धे पैसे भरायला तयार असेल तर त्याचा विज पुरवठा कापता येत नाही असेही ते म्हणाले.





