33.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ ओबीसी विद्यार्थी वसतीगृहासाठी राजुरा,वणी,नाशिकात ओबीसी संघटनांचे निवेदन

ओबीसी विद्यार्थी वसतीगृहासाठी राजुरा,वणी,नाशिकात ओबीसी संघटनांचे निवेदन

0
22

blank

राजुरा/वणी/नाशिक,दि.03ः-राज्य सरकारने जिल्हास्तरावर obc(vj, nt, sbc) च्या विद्यार्थी व विद्यार्थिनीकरिता स्वतंत्रपणे मंजूर केलेली 72 वस्तीगृहे त्वरित सुरू करण्याच्या मागणीला घेऊन आज राज्यातील विविध तालुक्यात ओबीसी बहुजन संघटनाच्यावतीने निवेदन देण्यात आले.चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे मराठा सेवा संघाच्यावतीने निवेदन सादर करुन ओबीसींचे वसतीगृह तत्काळ सुरु न झाल्यास आंदोलनाचा इशारा निवेदनातून दिला आहे.निवेदन देतेवेळी दिनेश पारखी, संभाजी साळवे, दत्तात्रय मोरे, बाबुराव मुसळे, मधुकर मटाले, सुरेश बोंडे, संतोष रामगिरवार, दिलीप गिरसावले, अशोक मुन, सुरज भामरे, रॉकी तडसे, राकेश देवाळकर उपस्थित होते.blank
नाशिक -भटके विमुक्त समाज विकास परिषदेच्यावतीने obc(vj, nt, sbc) च्या विद्यार्थी व विद्यार्थिनीकरिता स्वतंत्रपणे वसतीगृह सुरु करण्यात यावे मागणीचे निवेदन नाशिकचे उपजिल्हाधिकारी भीमराज दराडे यांना सादर करण्यात आले.निवेदन देतेवेळी  भटके विमुक्त समाज विकास परिषदेचे अध्यक्ष रतन सांगळे,कार्याध्यक्ष मांगुलाल जाधव, बाळासाहेब नरवाडे बापू शिंदे,गिरीजा चौथे , रंजना जाधव आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.blank
यवतमाळ — जिल्ह्यातील वणी-झरी-मारेगाव येथील ओबीसी संंघटनेच्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकारने जिल्हास्तरावर obc(vj, nt, sbc) च्या विद्यार्थी व विद्यार्थिनीकरिता स्वतंत्रपणे मंजूर केलेली 72 वस्तीगृहे त्वरित सुरू करावी,या मागणीचे निवेदन वणी तहसीलदारा मार्फत  मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व बहुजन कल्याणमंत्री यांना  OBC(VJ, NT, SBC) जातनिहाय जनगणना कृती समितीच्यावतीने पाठविण्यात आले.

blank