34.4 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ आरोग्य संस्थेत कार्यान्वित होणार हत्तीरोग उपचार क्लिनिक-सहाय्यक संचालक डॉ.एस.डी. निमगडे

आरोग्य संस्थेत कार्यान्वित होणार हत्तीरोग उपचार क्लिनिक-सहाय्यक संचालक डॉ.एस.डी. निमगडे

0
30

blank

गोंदिया,दि.03ः “ आरोग्य संस्थेत कार्यान्वित होणार हत्तीरोग उपचार क्लिनिक  बाबतची जिल्हास्तरीय कार्यशाळेची आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन सभागृहात पार पडली. सदर कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी नयना गुंडे व जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटिल यांचे उपस्थितीत पार पडले.
कार्यशाळा प्रसंगी जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी हत्तीरोग प्रतिबंध व कमी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना दिल्या तर हत्तीरोग रुग्णाला समाजात वावरताना एकाकी न ठेवता मानसिक आधार व विकृती कमी करण्यासाठी गाव पातळीवर ग्रामपंचायतच्या माध्यमातून समुपदेशन केंद्र निर्माण करण्यात यावी असे अनिल पाटील यांनी सुचवले.
सदर कार्यशाळेला जागतिक आरोग्य संघटनेचे कन्सल्टंट डॉ. भाग्यश्री त्रिवेदी यांनी हत्तीरोग रुग्णांसाठी जिल्ह्यात कार्यान्वित होत असलेले हत्तीरोग पिडीतांचे विक्रुती व्यपस्थापन क्लिनिकचे सादरीकरण केले. तसेच हत्तीरोग रुग्णाला एम.एम.डी.पी.किटच्या सहायाने उपचार करण्याचे प्रात्यक्षिक सर्वांना दाखवले.
गोंदिया जिल्हा हा हत्तीरोग संबंधाने सवेंदनशिल जिल्हा म्हणून राज्यात गणना केली जाते. हत्तीपाय रुग्णाला पायाला सूज येऊन विकृती निर्माण होते तसेच कालांतराने पायाला जखमा सुद्धा होऊ शकतात त्यावर प्रतिबंधक उपचार म्हणून हत्तीरोगाच्या पायाचे विकृती व्यवस्थापन करण्याच्या हेतूने ज्या ज्या भागात हत्तीरोगी रुग्ण आहेत त्या ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व उपकेंद्रात हत्तीरोग पिडीतांचे विक्रुती व्यपस्थापन क्लिनिक कार्यान्वित करण्याच्या सूचना डॉ. एस.डी. निमगडे यांनी दिल्या. रुग्णाला विक्रुती प्रतिबंध करण्याच्या उपचार सेवा, औषधे ,साहित्य तिथे कार्यान्वित राहणार आहे. तसेच रुग्णांना निशुल्क एम.एम.डी.पी.किट घरी देण्यात येऊन रुग्णांना उपचारात्मक समुपदेशन करण्यात येणार आहे.
हत्तीरोग प्रतिबंधासाठी दरवर्षी जिल्ह्यात एक दिवसीय सामुदायिक औषध उपचार मोहिम राबविण्यात येते. मोहिम दरम्यान आरोग्य कर्मचारी घरोघरी प्रत्यक्ष भेटी देऊन डी.ई.सी.व अल्बेंडेझॉल गोळ्यांची मात्रा वयोमानानुसार लोकांना खाऊ घालतात तरी त्या गोळ्यांची मात्रा लोकांनी सेवन करण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे यांनी या वेळेस केले तसेच जिल्हा आरोग्य प्रशासनातर्फे हायड्रोसील असलेल्या लोकांचे मोफत ऑपरेशन करण्यात येणार आहे त्याबाबत जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करण्याबाबतच्या सूचना जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे यांनी दिल्या.
कार्यशाळेला नागपूर विभागाचे सहाय्यक संचालक(हिवताप) डॉ.एस.डी. निमगडे, जागतिक आरोग्य संघटनेचे कन्सल्टंट डॉ. भाग्यश्री त्रिवेदी, अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमरीश मोहबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश सुतार, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. नितीन कापसे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. वेद प्रकाश चौरागडे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. निरंजन अग्रवाल, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. रोशन राऊत  उपस्थित होते.
कार्यशाळेचे प्रास्ताविक डॉ. नितीन वानखेडे ,सूत्रसंचालन डॉ. दिनेश सुतार व आभार प्रदर्शन डॉ. निरंजन अग्रवाल यांनी केले. कार्यशाळा प्रसंगी जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक,प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी, आरोग्य विभागातील सर्व अधिकारी, जिल्हास्तरीय पर्यवेक्षक उपस्थित होते.

blank