43.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ हल्बीटोला शेत शिवारातील विहिरीत पडली अस्वल

हल्बीटोला शेत शिवारातील विहिरीत पडली अस्वल

0
29

blank

गोरेगाव  : तालुक्यातील हल्बीटोला तेढा येथील शेतशिवारात ४ सप्टेंबरला रात्रीच्या सुमारास रामू खांडवाये
यांच्या शेतशिवारात विहिरीत अस्वल पडली.ही घटना कळताच परिसरात खळबळ उडाली.5 सप्टेंबरला सकाळी 9 वाजेच्या दरम्यान सदर प्रकार नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर काशिनाथ भेंडारकर यांनी गोंदिया जिल्हा आपत्ती निवारण समिती व वन विभाग गोरेगावला माहिती दिली.माहिती मिळताच जिल्हा आपत्ती निवारण समिती व वन विभागाचे कर्मचारी घटना स्थळी दाखल झाले.
विहिरीत पडलेल्या अस्वलला मोठ्या शिताफिने बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला यश आले आहे.यावेळी घटनास्थळी
बघ्यांची गर्दी पाहायला मिळाली.विहिरीच्या बाहेर येताच अस्वलने घटना स्थळावरून पळ काढला.

blank