
तिरोडा– तालुक्यात राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत 6 सप्टेंबर रोजी तालुका तिरोडाच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र सुकडी/डाक येथे भव्य पुरुष नसबंदी (बिनटाका) शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात 81 पुरुषांनी नसबंदी शस्त्रक्रिया साठी नोंदणी केली होती व त्यापैकी 75 पुरुषांची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. सफल शस्त्रक्रिया सर्जन डॉ. अभय पाटील व डॉ. हुमणे यांनी केल्या.
शस्त्रक्रिया शिबिर यशस्वी होण्याकरिता तालुका आरोग्य अधिकारी तिरोडा डॉ. स्वाती घोडमारे व प्राथमिक आरोग्य केंद्र सुकडी/डाक चे वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता भोयर यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे पार पडले. सर्वात प्रथम 30 ऑगस्ट 2022 रोजी तालुकास्तरीय सर्व विभागांची समन्वय सभा उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडली या सभेत भव्य पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन सर्वोनुमते दिनांक ६/०९/२२ मंगळवारी घेण्याचे ठरविले.त्या सभेत गटविकास अधिकारी श्री.लिल्हारे,तहसीलदार श्री.प्रशांत घोरुडे,पोलीस उपनिरीक्षक श्री. तायडे, बाल विकास प्रकल्प अधिकारी श्री. चौधरी, गटशिक्षणाधिकारी श्री. पारधी, उपजिल्हा रुग्णालय तिरोडा डॉ. हिंम्मत मेश्राम व तालुक्यातील चारही प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
शस्त्रक्रिया शिबिर यशस्वी होण्याकरिता महत्वाचे ठिकाणी बँनर, गावोगावी पॉम्प्लेट व दंवडीच्या माध्यमातुन जनजाग्रुती करण्यात आली. तसेच लोकांना जाग्रुत करण्यास तालुक्यातील पदाधिकारी यांनी महत्वाची भुमिका बजावली. शस्त्रक्रिया शिबिर रोजी सुकडी/डाक प्रभागचे जिल्हा परिषद सदस्य जगदीश भाऊ बावनथडे यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले.
शिबिरा प्रंसगी सर्व कर्मचार्यांचे कामाचे नियोजन जबाबदार्या सोपविण्यात आल्या.
नोंदणी विभाग रेखा पटले, कल्पना रंहागडाले, सीमा चौरे, अपेक्षा पटले इ. गटप्रवरतक यांनी काम पाहिले. रुग्ण तपासणी वैद्यकीय अधिकारी डॉ. तुलसी भगत , डॉ.रजनिश डोंगरे, डॉ. रोहिणी बिसेन, डॉ.शिवकुमार हरिणखेडे व डॉ फटिंग, डॉ. रोहित हरीणखेडे, डॉ.अशोक भगत इ. सामुदायिक आरोग्य अधिकारी यांनी केले. प्रयोगशाळा तपासणी मंगला बिसेन, मीनाक्षी बघेले इ.प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांनी केले.इंजेक्शन विभागात प्रीती वडीचार, छबीता भगत, मेघा क्षीरसागर इ. आरोग्य सेविका होत्या. ऑपरेशन थिएटर विभागात शालू पारधी, श्रद्धा बोरकर, तारा तितिरमारे, वर्षा पालांदूरकर, शोभा राठोड इ.नी काम पाहिले. शिबिरा प्रंसगी व्यवस्थापक मनोज भुरे, प्रकाश राऊत इ.आरोग्य सहाय्यक व श्रीकांत राऊत आरोग्य सेवक व प्रणिता भोयर यांनी पाहिले. तसेच शिबिरा दरम्यान आहाराबाबत सरला पारधी, चित्रशिला चौरे ,दिपा टेंभरे इ. आशा सेविका यांनी चोख भुमिका निभावली.
शस्त्रक्रिया शिबिर डॉ. आदित्य दुबे, डॉ. दिनेश मोटघरे, डॉ.शिवकुमार हरिणखेडे, डॉ. संगीता भोयर, तालुका आरोग्य सहाय्यक सुरेश धुर्वे, तालुका लेखापाल मनोज सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी पार पडले.
शस्त्रक्रिया शिबिर यशस्वी होण्याकरिता तालुक्यातील सर्व वैद्यकिय अधिकारी,सामुदायिक आरोग्य अधिकारी,आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहाय्यिका, आरोग्य सेविक, आरोग्य सेविका, आशा सेविका व इतर कर्मचारी यांनी मोलाची कामगिरी बजावली.
– डॉ. स्वाती घोडमारे तालुका आरोग्य अधिकारी तिरोडा
पुरुष नसबंदी (बिनटाका) शस्त्रक्रियेने पुरुषांच्या शारीरिक व मानसिक क्षमतेत कुठलाही फरक पडत नाही , कुठलाही अशक्तपणा जाणवत नाही, माणुस पुर्वी सारखाच कष्टाचे काम करु शकतो, बिन टाक्याची शस्त्रक्रिया अत्यंत कमी वेळेची शस्त्रक्रिया आहे, शस्त्रक्रिये नंतर दवाखान्यात भरती होण्याची गरज नाही लगेच डिस्चार्ज मिळतो, कमी त्रासाची कमी वेळेची व जास्त मोबदला देणारी मिळणारी शस्त्रक्रिया असल्याने सर्व तालुक्यात अशा प्रकारच्या भव्य पुरुष नसबंदी (बिनटाका) शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
– डॉ. नितीन वानखेडे जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया





