
डाॅ. गजानन डोंगरवार यांचा स्तुत्य उपक्रम
अर्जुनी-मोरगाव : आझादी अमृत महोत्सव निमित्ताने व स्व.गंगुबाई डोंगरवार स्मृतीप्रित्यर्थ तथा शामरावबापु कापगते स्मृती प्रतिष्ठान साकोली व डाॅ. गजानन डोंगरवार परिवार झरपडा यांच्या संयुक्त विद्यमाने मौजा झरपडा येथे डाॅ. डोंगरवार यांच्या राहते घरी “श्री” पर्वावर झरपडा येथील १०२ विधवा महिलांना ८ सप्टेंबर रोजी मातोश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
मातोश्री पुरस्कार प्रदान सोहळ्याचे उदघाटन आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री इंजिनियर राजकुमार बडोले राहणार आहेत. दीप प्रज्वलन ह.भ.प. प्रशांत ठाकरे महाराज प्रसारक गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज मोझरी, प्रमुख पाहुणे म्हणून साकोलीचे माजी आमदार डॉक्टर रामकृष्ण कापगते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग प्रसारक सुजित कुंभारकर, भाजपाचे संघटन मंत्री वीरेंद्र अंजनकर, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गजानन डोंगरवार, झरपडाच्या सरपंच कुंदा डोंगरवार, मनीष कापगते, प्रकाश डोंगरवार, संतोष डोंगरवार, डॉक्टर मनोज डोंगरवार, सदानंद डोंगरवार प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.समाजात विधवा महिलांना अनेक प्रकारे संकटांना समोर जाऊन परिवारात काम करावे लागते. मुलांचे शिक्षण संगोपन व लग्न यासारखे कठीण कार्य करावे लागते. त्यांच्या कार्याचा सन्मान करण्याच्या दृष्टीने व त्यांचे मनोबल वाढविण्याच्या दृष्टीने झरपडा गावातील १०२ विधवा महिलांना मातोश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन झरपडा तालुका अर्जुनी मोरगाव येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा अध्यक्ष शामराव बापू कापगते प्रतिष्ठान साकोली डॉक्टर गजानन डोंगरवार यांनी केले आहे.



