
जिल्हाधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकारी व जि.प.अध्यक्षांकडे लेखी तक्रार
चिचगड,दि.१४ः- जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाच्यावतीने विविध ठिकाणी भरणारे आठवडी बाजार लिलाव करण्यात येतात.ते बाजार खरेदी करणारे कंत्राटदार हे भाजीव्यवसायीकांसह इतर दुकानदाराकडून वसुुलीच्यावेळी अरेरावीच्या भाषा वापरत असल्याची तक्रार दुकानदारांनी जिल्हाधिकारी,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी,जि.प.अध्यक्षांसह इतरांकडे केली आहे.
येथील आठवडीबाजार दर शनिवारला भरत असून देवरी,ककोडीसह इतर ठिकाणचे व्यापारी आपली दुकाने याठिकाणी लावत असतात.त्यांच्याकडून बाजार ठेकेदार हा अरेरावीची भाषा वापरत प्रती कट्टा 50 रुपयाप्रमाणे वसुल करतो.मात्र त्या रक्कमेप्रमाणात कुठलीही पावती देत नाही.बाजार लिलावात विकत घेणार्या ठेकेदाराने कुठलाही दरफलक लावलेलाही नाही.ठेकेदाराच्या अरेरावी वागण्यामुळे अनेक व्यापारी त्रस्त होऊन येणेच बंद केले आहे.त्यातच सदर ठेकेदार वसुली करीत असताना आपल्यासोबत हुज्जत घालण्यासाठी दोन-चार लोक सोबत घेऊन येत असल्याने व्यापारी वर्गात दहशत निर्माण झाली आहे.त्यातच बाजार ठेकेदार तुम्हाला जे करायचे आहे करून टाका माझं कुणी काही करू शकत नाही अशाप्रकारची भाषा वापरत असल्याने या आठवडी बाजारात येणारे शेतमाल विक्रेते व शेतकरी दुकानदारानी उपविभागीय अधिकारी,गटविकास अधिकारी साहेब, आमदार देवरी-आमगाव विधानसभा क्षेत्र,पोलीस स्टेशन चिचगड व ग्रामपंचायत चिचगडला 42 लोकांच्या सह्यानिशी तक्रार केली आहे.





