42.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ सोदलागोंदी येथे एक दिवस माझा बळीराजाकरिता

सोदलागोंदी येथे एक दिवस माझा बळीराजाकरिता

0
33

blank

गोरेगांव,दि.16:-तालुका कृषी अधिकारी कार्यालय व उमेदच्यावतीने सोदलागोंदी येथे माझा एक दिवस माझा बळीराजासाठी राबविण्यात आला. सोदलागोंदी हे गाव 27 हेक्टर शेती व 35 कुटुंब असलेले तसेच भौगोलिक क्षेत्राच्या 70 टक्के वन व्याप्त पुर्ण आदिवासी बहुल गाव आहे.शेतकऱ्यांच्या समस्या जाणुन घेण्यासाठी मौजा सोदलागोंदी या गावात शेतकरी गोविंद सदाराम राऊत यांची भेट घेत चर्चा करण्यात आली. यावेळी तालुका कृषीअधिकारी सौ.एस.जे.पाटोळे व उमेदचे सेंद्रिय शेती प्रभाग समन्वयक प्रशांत भगत यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
चोपा येथील कृषी पर्यवेक्षक एम.बी.ठाकुर यानी भात पिकावरील मित्र किळीविषयी ओळख आणी सेंद्रीय शेती घटकाचा निंबोळी अर्क तयार करुन त्यांचे वापर करण्याविषयी मार्गदर्शन केले.मंडळ कृषी अधिकारी सी.बी.कारंजेकर यांनी भात पिकावरील कीड व रोग खोडकिडा ,तुडतुडा ,गादमाशी,करपा या किडीचे यांत्रिकी पद्धतीने नियंत्रण करण्याविषयी मार्गदर्शन केले.
उमेद अभियान प्रभाग समन्वयक सेंद्रिय शेती अधिकारी गोरेगांव प्रशांत भगत यांनी बीज प्रकिया पासून 30 टक्के किडी द्वारे होणारे नुकसान कसे कमी करता येईल व दशपर्णीअर्क, जिवामृत,अग्रिस्त्र तयार करणे व त्याचा वापर करणे या विषयी मार्गदर्शन केले. जिल्हा परिषद सदस्य ससेंद्र भगत यांनी आपल्या मार्गदर्शनात 35 घर आलेल्या 27.00 हेक्टर भौगोलिक गावात सेंद्रिय शेती प्रकल्प राबविण्यात येईल अशी माहिती दिली.
कृषी अधिकारी गोरेगांव एस.जे.पाटोळे यांनी कृषी विभागातील विविध योजनांची माहिती दिली तसेच उमेद अंतर्गतअसलेल्या नागझिरा स्वयंसहायता शेतकरी बचत गटाला भेट देऊन त्यांनी तयार केलेल्या मोह- राब, कारलेचे लोणचं, मोहाचे लोणचं यांची पाहणी केली व खरेदी सुद्धा केली. शेतकरी गटाने प्रधान मंत्री सुक्ष्म खाद्य अन्न प्रक्रिया योजनेचे अर्ज करुन pmfme योजनेचा फ़ायदा घावे असे आवाहन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक मार्गदर्शन सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा गजानन ए.पटले यांनी केलेकृषी सहायक मुंडीपार बी.एस.कटरे सर यांनी आभार मानले.सदर कार्यकमाला गावतील 25 पुरुष व 37 महिलांची शेतकऱ्यांची उपस्थित्ती होती.

blank