40.6 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ अपंगांना शासकिय योजनांचा लाभ मिळणे हा त्यांचा संवैधानिक अधिकार -आमदार चंद्रिकापुरे

अपंगांना शासकिय योजनांचा लाभ मिळणे हा त्यांचा संवैधानिक अधिकार -आमदार चंद्रिकापुरे

0
30

blank

अर्जुनी मोरगाव-विविध शासकीय योजनांचा लाभ अपंगांना मिळालाच पाहिजे, संविधानातील तरतुदीनुसार तो तुमचा अधिकार आहे. याकरिता माझ्याकडून अपेक्षित असलेले सर्वतोपरी सहकार्य करण्यास मी तयार आहे, असे प्रतिपादन अर्जुनी/मोर विधानसभाचे आमदार. मनोहर चंद्रिकापुरे यांनी केले.
अपंग कल्याणकारी संघटना गोंदिया, तालुका शाखा अर्जुनी/मोर व एपीजे अब्दुल कलाम अपंग सहायता गट नवेगाव बांध यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारला आयोजित दिव्यांग मार्गदर्शन व शासकीय योजनांची माहिती तसेच संघटनेच्या सभासद नोंदणी शिबीर प्रसंगी ते उद्घाटक या नात्याने बोलत होते.
सदर शिबिराचे उद्घाटन नवेगावबांधचे सरपंच अनिरुद्ध शहारे यांच्या अध्यक्षतेखाली आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या हस्ते पार पडले. प्रमुख अतिथी म्हणून अपंग कल्याणकारी संघटना गोंदिया जिल्ह्याचे अध्यक्ष दिगंबर बनसोड, सचिव दिनेश पटले ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक लोकपाल गहाणे, सालेकसा तालुका अध्यक्ष चंद्रकला डहारे ,तिरोडा तालुका अध्यक्ष सविता चौधरी, इंदिराबाई भंडारी आदी उपस्थित होते .
आपल्या अपंगत्वावर रडत बसण्यापेक्षा जिद्द व चिकाटीने शासनाच्या योजना नुसार व्यवसाय व उद्योग याकडे वळून अपंगत्वावर मात करावी याकरीता शासनाच्या विविध अनुदानावरील योजना आहेत त्यांचा आपण लाभ घ्यावा तसेच अपंग बालकांच्या पालकांनी आपल्या पाल्यांना चांगले शिक्षण द्यावेअसे आव्हान सुद्धा याप्रसंगी पुढे बोलतांनी आमदार चंद्रिकापुरे यांनी केले .
अपंगांच्या योजना व त्यांचे लाभ सामाजिक न्याय विभागांतर्गत चालवले जातात मात्र सामाजिक न्याय विभाग अपंगांना योग्य प्रकारे न्याय देण्यात अपयशी ठरले आहे त्यामुळे अपंग व्यक्तींसाठी स्वतंत्र मंत्रालय निर्माण करून दिव्यांगांच्या योजना त्यांच्यामार्फत राबवाव्यात अशी मागणी याप्रसंगी जिल्हा सचिव दिनेश पटले यांनी केली . अपंग व्यक्तींना जिल्हा कार्यालयामध्ये योग्य प्रकारे वागणूक दिली जात नाही त्यांच्यावर अन्याय केला जातो असा आरोप याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष दिगंबर बनसोड यांनी केला व अपंगासाठी राखीव असलेल्या पाच टक्के निधीचे नियोजन जिल्हास्तरावर योग्य प्रकारे करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली .
हिंमत न हारता संघर्षमय अपंगत्वावर मात करून अपंग व्यक्ती सुद्धा आपल्या जीवनात खूप मोठे परिवर्तन घडवू शकतो , नवेगावबांध ग्रामपंचायत अंतर्गत पाच टक्के निधी दरवर्षी दिव्यांगांना देण्यात येत आहे अशी माहिती कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानीय सरपंच अनिरुद्ध शहारे यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये दिली.
तत्पूर्वी कार्यक्रमाच्या सुरुवातीला लक्ष्मी मातेचे पूजन व माल्यार्पण करून शिबिराची सुरुवात करण्यात आली . प्रास्ताविक तालुका संघटनेचे अध्यक्ष अशोक रामटेके यांनी केले , संचालन सतीश कोसरकर यांनी तर आभार प्रदर्शन मुरलीधर पालीवाल यांनी केले . शिबिराच्या यशस्वितेसाठी एपीजे अब्दुल कलाम अपंग सहायता गटाचे अध्यक्ष दिलीप कापगते ,सचिव चतरू डोंगरवार, उपाध्यक्ष दिनेश डोये , कोषाध्यक्ष सतीश कोसरकर , शांताबाई भूमके ,राजकुमार झोळे, गजानन बावणे ,देवेन्द्र राऊत आदींनी अथक परिश्रम घेतले.
याप्रसंगी निस्वार्थ सेवाभावी स्थानिय स्वच्छता दुत विक्रमसिंह पवार यांचा शाल व श्रीफळ देवून अतिथींचे हस्ते सत्कार करण्यात आला.

blank