
सडक अर्जुनी-पंचायत समिती सडक अर्जुनी अंतर्गत येणाऱ्या वडेगाव/सडक येथे सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले आहे.15 वित्त आयोग अंतर्गत सिमेंट रोडचे बांधकाम ग्रामपंचायत गेट ते कार्यालयापर्यंत करण्यात येणार आहे. बांधकामाचे अंदाजपत्रक 4 लाख 50 हजार आहे. भूमिपूजन प्रसंगी ग्रामपंचायत सरपंच हेतराम खोटेले, सदस्य गिरीपाल फुले ग्रामसेवक संजय पटले , संजय मेंढे, उपसरपंच छाया डोये, सुरेश भंडारकर ,बंडू मेंढे, अनिता मेंढे संगीता मेंढे, शशिकला चुटे, नीलकंठ फुले आदी मान्यवर उपस्थित होते. वडेगावात विविध विकासात्मक कामे होत असल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. संचालन राकेश कोरे आभार विवेक मेंढे यांनी मानले.





