31.2 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ मे.स्वास्तिक पॅकर्सवर अन्न प्रशासनाची धाड, ८० टीन तेल जप्त

मे.स्वास्तिक पॅकर्सवर अन्न प्रशासनाची धाड, ८० टीन तेल जप्त

0
74

blank

गोंदिया,दि.23- अधिक पैसा कमवण्याच्या नादात अनेकजण तेलाचा पुनर्वापर केला जातो. अशाच प्रकार होत असल्याच्या माहितीवर गोंदियाच्या आयटीआय फुलचूरपेठ येथील मे.स्वास्तिक रिफाईन पॅकर्स येथे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी २२ सप्टेंबर रोजी धाड घालून अस्वच्छ असलेल्या टीनमध्ये रिफाईंड सोयाबीन तेल साठवल्याने ते ८० टिन तेल जप्त केले आहे.

गुलशन अग्रवाल यांच्या मालकीचे असलेल्या फुलचूरपेठ येथील मे.स्वास्तिक रिफाईन पॅकर्स यामध्ये अस्वच्छ पुनर्वापर करण्यात येत असलेल्या टीनमध्ये रिफाईंड सोयाबीन तेल विक्रीकरीता साठवून ठेवण्यात आले होते. त्या ८० टीनमध्ये ११९८ किलो सोयबीन तेल होते.त्या तेलाची किंमत १ लाख ६६ हजार २१६ रूपये सांगितली जाते.अन्न सुरक्षा व माणके कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी धाड घालून तो तेल जप्त केला.त्यातील नमुने घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले.कलम ३८ अन्तर्गत कारवाई करून प्रयोगशाळेतून अहवाल आल्यानंतर पुढची कार्यवाही करण्यात येणार आहे. ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त ए.पी.देशपांडे, सहाय्यक आयुक्त अन्नपुरे यांच्या मार्गदर्शनात अन्न सुरक्षा अधिकारी शितल देशपांडे, महेश चहांदे यांनी केली आहे.

blank