कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर लाभार्थ्याची पहिली यादी प्रसिध्द

0
87

गोंदिया,दि.14- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभार्थ्याची पहिली यादी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. तरी पात्र शेतकऱ्यांनी या यादीचे अवलोकन करुन नाव असल्याची खातरजमा करावी असे जिल्हा उपनिबंधक प्रशांत सोनारकर कळविलेले आहे.

          महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत सन 2017 ते 2020 या तीन आर्थिक वर्षापैकी कोणत्याही दोन आर्थीक वर्षात पीक कर्जाची उचल करुन विहित मुदतीत नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना वरील कालावधीत घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दल रकमेवर जास्तीत जास्त 50 हजार रुपयापर्यंत प्रोत्साहनपर रक्कम  लाभ म्हणुन देण्यात मान्यता देण्यात आलेली आहे.

ज्या शेतकऱ्यांचे नाव पहिल्या यादीत आले आहे. अशा शेतकऱ्यांच्या याद्या गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा, राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखा, विविध कार्याकारी सेवा सहकारी संस्था ग्राम पंचायत चावडीवर, सहाय्यक निबंधक कार्यालय, तहशिल कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्थां या कार्यालयात प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत लाभार्थी शेतकऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा व राष्ट्रीय कृत बँकेच्या शाखा तसेच आपले सरकार सेवा केंद्र येथे आधार कार्ड व बँक पासबुक प्रमाणीत करून घ्यावे व योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, प्रशांत सोनारकर यांनी केली आहे.