40.7 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ सामाजिक न्यायमंत्र्याच्या ताफ्यातील पोलीस वाहनाला अपघात

सामाजिक न्यायमंत्र्याच्या ताफ्यातील पोलीस वाहनाला अपघात

0
23

दोन कर्मचारी जखम : कोकणा- खोबा गावाजवळची घटना

सडक अर्जुनी, दि. २८ : राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तसेच गोंदियाचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या ताफ्यातील पोलिस वाहनाचा (पायलट) मागील टायर फुटल्याने झालेल्या या अपघातात दोन पोलिस कमचारी जखमी झाले. ही घटना कोकणा- खोबा गावाजवळ रविवारी (ता. २८) सायंकाळी चार वाजताच्या सुमारास घडली.सहायक फौजदार शेंडे व पोलिस हवालदार पिल्हारे अशी जखमींची नावे आहेत. अर्जुनी मोरगाव येथील नियोजित दौरा आटोपून पालकमंत्री राजकुमार बडोले हे सडक अर्जुनीकडे येत होते. त्यांच्या ताफ्यात गोंदिया पोलिस मुख्यालयाचे पायलट वाहनदेखील होते. या वाहनात ३ पोलिस कर्मचाèयांसह एक चालक असे चारजण होते. दरम्यान, कोकणा- खोबा गावाजवळ पायलट वाहन येताच या वाहनाचा मागील टायर फुटला. या अपघातात मागे बसलेले सहायक फौजदार शेंडे व पोलिस हवालदार पिल्हारे हे जखमी झाले. जखमींना सडक अर्जुनीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

blank