जेठभावडा शाऴेच्या विद्यार्थ्यांना टॅबचे वितरण

0
19

देवरी ,दि.28-  पंचायत समितीतर्गंत येणार्या आणि विदर्भातिल प्रथम ISO मानांकित ठरलेल्या ग्रामपंचायतीसह 100 टक्के डिजिटल शाळा ठरलेल्या जेठभावडा येथील विद्यार्थ्यांना आज रविवारला(दि.28) जिल्हा परिषद अध्यक्ष,खासदार ,आमदार यांच्या हस्ते टॅबचे वितरण करण्यात आले.यावेळी शाळेला डिजिटल करण्यामागची भूमिका शाळेच्या शिक्षकांनी पाहुण्यांना सांगितले.टॅब वितरण कार्यक्रमाला गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अशोक नेते, जि.प.अध्यक्ष सौ उषा मेंढे, देवरी-आमगाव मतदारसंघाचे आमदार संजय पुराम, जि.प.शिक्षण सभापति पि.जि.कटरे,जि.प.सदस्य सौ उषा शहारे,पंचायत समतिचे सभापती ,उपसभापती यांच्यासह गावातील सरपंच व इतर सदस्य उपस्थित होते.साेबतच सामाजिक कार्यकर्ते कुलदीप लांजेवार पण यावेळी उपस्थित होते.यावेळी मान्यवरांनी ग्रामपंचायत व शाळेची पाहणी केली.शिक्षक किशोर गर्जे यांनी शाळेसंबधी माहिती दिली. आमदार पुराम यांनी आपल्या मतदारसंघातील शाळा पुर्णत डिजिटल होण्याचा मान मिळाला असून पंतप्रधान यांच्या मेक इन इंडिया या विचाराला प्रोत्साहित करणारी संकल्पना आपल्या मतदारसंघातून सुरु झाल्याबद्दल अभिमान असल्याचे विचार व्यक्त केले.यावेळी प्रोजेक्टरच्या माध्यमातून शिक्षण उपक्रमाची माहिती देण्यात आली.तसेच  प्रत्येक विधार्थ्याँना तंत्रद्यान युक्त शिक्षण मिळाव या हेतूने शालेतिल विधार्थ्याँना tab चे वितरण करण्यात आले.