गोंदिया- तालुक्यातील ग्राम रापेवाडा येथे श्छोटेलाल रहांगडाले यांच्या निवासस्थानी व ग्राम पिंडकेपार येथे डेविड बडगे यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक माजी आमदार राजेंद्र जैन, केतन तुरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी आगामी ग्रामपंचायत च्या निवडणुकीच्या संदर्भात पक्षाची ध्येय धोरणे व भूमिका व अन्य विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी माजी आमदार राजेंद्र जैन म्हणाले की, खासदार प्रफुल पटेल यांच्या माध्यमातुन शेतकऱ्यांचा प्रगती साठी सिंचन व रोजगार उपलब्ध करणे व अन्य विकासाचे काम होत आहेत. याच जबाबदारीच्या दृष्टीकोनातून आपल्या गावांचा विकास करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार जातीत जास्त संख्येने निवडून येणे आवश्यक आहे. स्थानिक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत बूथ कमेटीची सर्वात मोठी जिम्मेदारी आहे. गावातील कार्यकर्त्यांच्या माध्यमातुन पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. स्थानिक पातळीवर पक्ष संघटना मजबूत असेल तरं यश नक्की मिळेलच असे प्रतिपादन राजेंद्र जैन यांनी केले.
यावेळी सर्वश्री राजेंद्र जैन, केतन तुरकर, सुनील पटले, हौसलाल रहांगडाले, शामराव रहांगडाले, रमेश रहांगडाले, केवलचंद रहांगडाले, गोविंदराव चौहान, योगेश्वर रहांगडाले, प्रमोद रहांगडाले, गुरुप्रसाद चौहान, दुर्योधन मेश्राम, लोकेश रहांगडाले, होमेन्द्र तुरकर, आर्यन बघेले, रौनक ठाकूर, अनुज रहांगडाले, धर्मपाल बिसेन, दुर्योधन बघेले, प्रदीप रहांगडाले, अविनाश रहांगडाले, पंकजसिंह बघेले, दिलीप रहांगडाले, विजय चौहान, सुनील रहांगडाले, राजू राऊत, डेविड बडगे, चुन्नीलाल राऊत, शेखर पटले, रोशन डोंगरे, टेकसंचय बागडे, कुणाल गोंडाणे, हेमंत कोठेवार, सुधीर बागडे, गणेश राऊत, अविनाश महावत, राजेश रहांगडाले, राजेश वैद्य, हौसलालजी, ओमप्रकाश चक्रवर्ती, सहित बहुसंख्येने पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.