राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पार्टीचा जातीवादी , ओबीसी विरोधी चेहरा पुन्हा उघड

0
23

ओबीसी जागेवर खोट्या ओबीसीना संधी दिल्याचा आरोप

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा (Senate) सदस्य साठी निवडणुका आहेत , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे ‘ऑक्सफोर्ड ऑफ द इस्ट’ म्हणून ओळखले जाते.खरे तर विद्यापीठाच्या निवडणुकीत राजकारण यायला नको होते पण राजकीय पक्षांनी त्या मध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे.

10 जाग्यांसाठी निवडणुका आहेत त्यातील 5 जागा विविध घटकांसाठी राखीव आहेत. या मध्ये एक जागा ही ओबीसी साठी राखीव आहे. राष्ट्रवादी कांग्रेस आणि भारतीय जनता पार्टी यांनी या निवडणुका प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. पण या निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही पक्षांचा जातीवादी व ओबीसी विरोधी चेहरा समोर आला आहे.
ओबीसी साठी राखीव गटातून दोन्ही प्रमुख पक्षांनी ओबीसी असल्याचा खोटा दावा करणारे मराठा उमेद्वार दिले आहेत. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातच सामाजिक न्यायाच्या संकल्पाने ला काळिमा फासला जात आहे. ही गोष्ट पुणे शहराला व पुरोगामी महाराष्ट्रला अजिबात शोभणीय नाही. शहराच्या संस्कृतीचा व राज्याच्या परंपरेचा कुठला ही विचार या राजकीय पक्षांनी केलेला नाही. ओबीसी मधून भाजपा व शिंदेगट पुरस्कृत उमेद्वार आहेत गोरडेपाटील सचिन शिवाजी त्याच बरोबर राष्ट्रवादी व शिवसेना (उद्धव ठाकरे गट ) उमेद्वार आहेत नगरसेवक पठारे महेंद्र पंढरीनाथ . हे दोघे ही मराठा समाजाचे असून फक्त आरक्षित जागेचा फायदा घेण्यासाठी ओबीसी असल्याचा खोटा दावा करत आहेत.

ओबीसी समाजकडून त्यांच्या न्याय हक्क हिसकावून घेतल्या जात असल्याचा आरोप होत आहे. अश्या परिस्थिती मध्ये ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व नाकारण्याचे काम हे दोन्ही राजकीय पक्ष जाणून बुजन करत आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा (Senate) निवडणुकाच्या निमित्ताने पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी च्या जातीवादी आणि ओबीसी विरोधी चेहरा समोर आल्याचे दिसते आहे.