आमगाव,दि.19ः नजिकच्या चिरचाळबांध येथील हरिहर भाई पटेल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय चिरचाळबांध येथे शिक्षक, पालक,माता-पिता आणि पाल्यांची संयुक्त सभा आयोजित करण्यात आली होती.या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य बन्सीधर शहारे होते. तर प्रमुख वक्ते म्हणून आमगाव येथील आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ उमाकांत पटले उपस्थित होते.प्रमुख पाहुणे म्हणून क.महा.प्रभारी आर.एच.बांदरे, पालक सुरेशं चव्हाण,भुमेन्द्र हरीणखेडे,सरिता मटाले, सीमा भांडारकर उपस्थित होते.कार्यक्रमाप्रसंगी डॉ.उमाकांत पटले यांनी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गुणवत्ता, शैक्षणिक दर्जा, गुणवत्ता वाढीसाठी उपाय सुचवले तसेच शिक्षणाचे, शारीरिक शिक्षण यांचें महत्त्व समजावून सांगितले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी.बी चव्हाण यांनी केले तर आभार कु.जी एम.तुरकर यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी परीश्रम घेतलें.