गोंदिया- दिल्ली येथील श्रद्धा वालकर हिची निघृण हत्येचा निषेध करुन आरोपीला फासीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी विहिंप, मातृशक्ती, दुगार्वाहिनीच्या वतीने राष्ट्रपतींना करण्यात आली आहे. तसे निवेदन जिल्हाधिकार्यांना देण्यात आले.
निवेदनानुसार, भारतात लव्ह जिहादच्या नावाखाली हिंदू मुलींना फसवणूक त्यांच्या हत्या होण्याच्या घटनेत वाढ होत आहे. अशात दिल्ली येथील श्रध्दा वालकर हिची हत्या अत्यंत चिंतेचा विषय आहे. राष्ट्रपती व भारत सरकारने या घटनेतील आरोपी आफताबला फासीची शिक्षा देण्यात यावी. र्शध्दा आणि तिच्या कुटुंबीयांना लवकरात लवकर न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना मातृशक्तीच्या जिल्हा संयोजिका स्नेहल इटनकर, दुर्गा वाहिणीच्या जिल्हा संयोजिका तपस्या सेंगर, विहिंपच्या जिल्हा उपाध्यक्ष वंदना पाठक, रंजना कुलकर्णी, स्मिता शरणागत, संध्या गंगभोज, रूपाली रोकडे, संगीता रोकडे, सरोज जावळे, पूजा जावळे, स्मिता शरणागत, विश्वकर्मा, मिनू दिवनीवाल, पायल माखिजा, गीता सोनवणे आदी उपस्थित होते. भाजप महिला मोर्चाचे निवेदन प्रेमप्रकरणात अडकून वसईच्या र्शद्धा वालकरची निर्घृण हत्या करणार्या आफताब पूनावाला याला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी भाजपा महिला मोर्चाच्या वतीने उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील, तहसीलदार चौरे यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा भावना कदम, शहराध्यक्षा निर्मला मिश्रा, महामंत्री नीलिमा माणिकपुरी, वर्षा खरोळे, मौसमी सोनछत्रा, के. एस. पोचेटीवार, अंशु सजार्रे, नीलिमा बैस यांच्यासह महिला उपस्थित होत्या.