31.2 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home शैक्षणिक निंबा शाळेत मद्यधुंद अवस्थेत शिक्षक मरसकोल्हे पडले वर्गखोलीत….

निंबा शाळेत मद्यधुंद अवस्थेत शिक्षक मरसकोल्हे पडले वर्गखोलीत….

0
187

blank

गोंदिया- जिल्हा परिषदेच्या गोरेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या निंबा येथील प्राथमिक पूर्व माध्यमिक शाळेत एका शिक्षकाने कर्तव्यावर असताना मद्य प्राशन करूनशाळेतील वर्गखोलीतच फरशीवर झोपल्याचा प्रकार आज गुरुवार २२ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास उघडकीस आला.जी. आर. मरसकोल्हेअसे शिक्षकाचे नाव सांगितले जाते.सदर शिक्षक नशेत ठुण असल्याने शिक्षकाला रुग्णवाहिकेने गोरेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.निंबा शाळेत इयत्ता 1 त 7 वी पर्यंतचे वर्ग असून 102 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.या शाळेत 4 शिक्षकांची नियुक्ती असून इयत्ता दुसरी व तिसर्या वर्गाला मरसकोल्हे हे शिक्षक शिकवितात.परंतु आज ते वर्गातील फरशीवरच मद्यधुंद अवस्थेत पडले असून उठत नसल्याचे विद्यार्थ्यांनी पालक, मुख्याध्यापक व इतर शिक्षकांना सांगितले.त्यांनीही मरसकोल्हे या शिक्षकाला उठविण्याचा प्रयत्न केला,परंतु कुठलाही प्रतिसाद दिला नाही. या प्रकाराची तक्रार जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे करण्यात आली आहे. आता दारूड्या शिक्षकावरवरिष्ठ अधिकारी कोणती कारवाई करतात याकडे विद्यार्थी, पालकांसह नागरिकांचे लक्ष लागून आहे.दरम्यान गोरेगाव पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी व प्रभारी गटशिक्षणाधिकारी निलकंठ शिरसाठे यांना यासंदर्भात विचारणा करण्याकरीता संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद न दिल्याने त्यांची याप्रकरणातील भूमिका कळू शकली नाही.

blank