40.6 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ पोवार समाजाच्या रूढी-परंपरेत भारतीय संस्कृतीचे दर्शन होते- माजी खासदार शिशुपाल पटले

पोवार समाजाच्या रूढी-परंपरेत भारतीय संस्कृतीचे दर्शन होते- माजी खासदार शिशुपाल पटले

0
38

blank

सिहोरा- क्षत्रिय राजाभोज पोवार समाज संघटन द्वारे मौजा सुकळी नकुल,गोंडीटोला ता.तुमसर येथे राजाभोज जयंती चे काल दि.३/जाने. ला आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी किसान मोर्च्याचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार शिशुपाल पटले होते. तर कार्यक्रमाचे उद्घाटन पोवार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष  मुरलीधर टेंभरे यांचे शुभ हस्ते पार पडले. समाजात पाश्चिमात्य संस्कृतीच्या शिरकाव्यामुळे समाजाची मोठ्या प्रमाणात आर्थिक व वेळेची हानी होत आहे.लग्न समारंभ,स्वागत समारोह यांचेवर होणारा खर्च कमी करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मुरलीधर टेंभरे यांनी आपल्या उद्घाटन पर भाषणातून केले.तर माजी खासदार  शिशुपाल पटले यानी आपल्या समाजाच्या रूढी परंपरा ह्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला अनुसरून असून,भारतीय संस्कृतीचे दर्शन करून देणारे असल्याचे आपल्या अध्यक्षीय भाषणातून सांगितले.जि प. माजी सभापती  धनेंद्र तुरकर, पोवार समाज संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विश्वजित पुंडे,देवचंदजी ठाकरे,सतिष चौधरी, उमेशभाऊ तुरकर,झाडुजी रहांगडालेव अन्य पदाधिकाऱ्यांनीही मार्गदर्शन केले. छोटेलाल ठाकरे, जितू पटले,देवेंद्र रहांगडाले,गंगाधर रिनायत,जितू तुरकर,संतोष शरणागत,धनराज भगत,भोजराम तुरकर, गणेश ठाकूर,छोटेलाल पटले,दिगंबर तुरकर,सुभाष बिसने,ताराचंद रहांगडाले,श्रीदयाल रहांगडाले,नादुभाऊ रहांगडाले,देवेंद्र मेश्राम,गणेश रहांगडाले,राजेंद्र बघेले, संतोष बघेले,लहान नेता संतोष गौतम हे उपस्थित होते, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समितीचे अध्यक्ष सोहनजी पारधी, सुनील रहांगडाले,रामेश्वर पटले,देवराव रहांगडाले तसेच समितीचे सर्व पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले,राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

blank