42.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ आयटक संलग्न अंगणवाडी कर्मचाऱ्यांची जिल्हा बैठक संपन्न

आयटक संलग्न अंगणवाडी कर्मचाऱ्यांची जिल्हा बैठक संपन्न

0
25

blank

**राज्यव्यापी संपासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी  तयारी करावी -काँ दिलीप उटाणे
भंडारा-: आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन भंडारा जिल्हा बैठक  ७ जानेवारी ०२३ रोजी  सविता लुटे यांच्या अध्यक्षतेखाली तर राज्य  कार्याध्यक्ष काॅ. दिलीप उटाणे,जिल्हा कार्याध्यक्ष काॅ.हिवराज उके,अल्का बोरकर, मंगला रामटेके, गौतमी मंडपे मंगला गजभिये,  रेखा टेंभूर्णे,वंदना पशिने,  कुंदा भदाडे,  वंदना बघेले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
वाढत्या महागाई नुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना  जाहिर केल्यानुसार मानधनवाढ करा, वारंवार शासन  आश्वासना पलिकडे काहीही करत नाही  त्यामुळे  आता अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संपासाठी  तयारी करावी असे प्रतिपादन राज्य कार्याध्यक्ष दिलीप उटाणे  यांनी केले.ते पुढे म्हणाले शासनाने २०१९ ला दिलेले मोबाईल निकृष्ट दर्जाचे आहेत. अशा अनेक तक्रारी यापूर्वी शासन व प्रशासनाकडे केले परंतु अजून पर्यत नविन मोबाईल दिले नाही. त्यामुळे अंगणवाडी सेविका अडचणीत सापडले आहेत.
आतातर मोबाईल चालत नाही.अँप डाऊनलोड होत नाही. झालेतर भरलेली माहीती अपलोड होत नाही.चांगल्या प्रतिचा ,मोबाईल द्या .पोषण टँकर मराठी द्या  या मागणीसाठी  राज्यभर मोबाईल वापस  आयटकच्या वतिने आंदोलन सुरु आहेत.आयुक्त रुबल अग्रवाल यांनी संघटना प्रतिनिधीची सोबत बैठक घेवून  नविन मोबाईल देण्यात येईल असे आश्वासन दिले.त्यानुसार शासनास प्रस्ताव दिला बजेट अधिवेशनात  महाविकास आघाडी सरकारने नविन मोबाईल साठी दहा हजार रुपये देण्यास येईल असे बजेट मध्ये तत्कालीन वित्त मंत्री  अजीतदादा पवार यांनी मंजूर केले सरकार बदलली परंतु  अंगणवाडी सेविकांना मोबाईल अजून  पर्यत देण्यात आले नाही. शासनाने दिलेला मोबाईल नादुरुस्त आहे व त्यात हा ऍप डाऊनलोड होत नाही त्यामुळे त्यांना आपल्या खाजगी मोबाईलवर ऍप डाऊनलोड करायला सांगितले जात आहे.
शासनाने दिलेल्या मोबाईल त्या पैकी  ९०% मोबाईल खराब आहे. नविन एँप डाऊनलोड होत नाही.त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील  सर्व  सेविका १६ जानेवारी पासून  मोबाईल शासनास परत करणार आहेत.स्थानिक अडचणी बाबत  कांचन मेशराम,सुनंदा बडवाईक, वंदना पशिने,मंगला गभने, छाया गजभिये, दिपा पडोळे, अनिता  घोडीचोरे,मंदा गोमासे, मोहनी लांजेवार,  धनश्री  बांगळकर, शालीनी गोडबोले,  सुनंदा हेडावू ,मनिषा गणवीर, विजया काळे, ललीता देवतारे, शालु कापसे, शारदा कळंबे, जयश्री वैद्य,  वैशाली भोंदे,अनिता शरनागत, गिता पचघरे,ऊषा मानकर,निशा रोडगे, बबती मेशराम,  स्वाती सिंगनजूडे,शुभांगु दडवे  इत्यादींनी व्यक्त केले.हा जानेवारी महिना  सावित्रीबाई फुले .व राजमाता जिजाऊ  यांचा मुखवटा लावून विचाराचा जागर करण्याचा निर्णय आयटकने घेतला आहे .त्यानुसार १६ जानेवारी लाखनी साकोली व लाखांदूर ,१७ जानेवारी  तुमसर व मोहाडी १८ जानेवारी भंडारा असे कार्यक्रम करण्यात येईल
बैठकीचे समारोप  वंदना पशिने यांनी केले.

blank