राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे अभिनंदन
****
अर्जुनी मोरगाव,दि.09ः ग्राम हा विश्वाचा नकाशा ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतील विचाराने प्रेरित होऊन , वैराग्यमूर्ती गाडगेबाबा च्या स्वच्छतेचा मूलमंत्र स्वीकारून शिरेगाव बांध ग्रामपंचायतचा सर्वांगीण विकास साधणारे तत्कालीन सरपंच, विद्यमान उपसरपंच ,ओबीसी संघर्ष समितीचे तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते इंजिनियर दादा( हेमकृष्ण ) संग्रामे यांना 8 जानेवारी 2023 रोजी विशेष जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .राष्ट्रवादी काँग्रेस द्वारे यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे
सिरेगाव बांध ग्रामपंचायत चे सरपंच पद इंजिनियर दादा संग्रामे यांनी पाच वर्ष भूषविले. त्यामध्ये शासनाच्या तालुका,जिल्हा, राज्यस्तरीय,केंद्र सरकारच्या सर्व योजना परिपूर्ण राबविल्यात. पक्षभेद बाजूला ठेवून, सर्वांना एकत्र करून ,ग्रामस्थांच्या सहकार्याने शासनाचे सर्व पुरस्कार मिळविले. उच्च शिक्षण , प्रेमळ स्वभाव , ग्रामोन्नती चा ध्यास यामुळे शिरेगाव बांधला स्मार्ट व्हिलेज केले.
दादा संग्रामे यांच्या ग्रामविकासाची दखल घेऊन ६ वे राज्यस्तरीय वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलनात विशेष जीवन गौरव पुरस्काराने कार्यक्रमाअध्यक्ष आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी खा. सुनील मेंढे ,आमदार मनोहर चंद्रिकापुरे, जनार्दन बोथे गुरुजी ,डॉ. प्रशांत ठाकरे महाराज , डॉक्टर संकेत काळे, लक्ष्मणदास काळे महाराज अड. वसंत एंचीलवार ,सुबोध दादा, सुखदास गाडेकर महाराज,राहुल निर्वाण, देवराव भांडारकर ,लोकपाल गहाणे इतर मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस अर्जुनी मोरगाव द्वारे अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ मोझरी द्वारे त्यांच्या कार्याची दखल घेऊन सन्मानित केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.





