अर्जुनी मोरगाव,दि.09ः नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये दैदिप्यमान यश मिळविलेल्या ईटखेडा येथे नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्काराचे आयोजन केले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले व आ. मनोहर चंद्रिकापुरे यांचे हस्ते सत्कार होणार आहे. या सत्काराचे आयोजन ग्रामविकास युवा परिवर्तन मंच द्वारे करण्यात आले आहे.
इटखेडा ग्रामपंचायत येथील ग्रामविकास युवा परिवर्तन मंचद्वारे निवडणूक लढविण्यात आली. त्यामध्ये सरपंच व सर्व नवहि ग्रामपंचायत सदस्यांनी दैदिप्यमान मोठ्या फरकाने विजयश्री मिळविली. जनतेने दिलेल्या विजयाचा कौल स्वीकारून नवनिर्वाचित सरपंच आशाताई इंद्रदास झिलपे, उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्काराचे आयोजन 14 जानेवारी 2023 रोज शनिवारला दुपारी 3.00 वाजता समाज मंदिर बाजार चौक इटखेडा येथे होणार आहे.
हे सत्कार समारंभ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले यांचे हस्ते, अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचे अध्यक्षतेखाली गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष माजी आमदार दिलीप भाऊ बन्सोड, गोंदिया जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंजिनिअर यशवंत गणवीर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष लोकपाल गहाणे, जिल्हा उपाध्यक्ष भागवत पाटील नाकाडे, काँग्रेस तालुका अध्यक्ष घनश्याम धामट, स्मार्ट व्हिलेज सिरेगाव/बांध चे उपसरपंच इंजि. दादा संग्रामे, जिल्हा परिषद सदस्या पौर्णिमा ढेंगे, श्रीकांत घाटबांधे, कविता कापगते पंचायत समिती सदस्या भाग्यश्री सयाम, पोलीस पाटील विकास लांडगे, कृ. उ.बा.स. चे प्रशासक उद्धव मेहंदळे, वि.का.से.चे अध्यक्ष सुभाष देशमुख, माजी सरपंच इंद्रदास झिलपे यांचे प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
ग्रामपंचायत व गावकऱ्यांनी सत्कार समारंभाची जैय्यत तयारी केली असुन गावात नवचैतन्य निर्माण झाले आहे. त्यामुळे या समारंभात अधिकाधिक संख्येने उपस्थिती दर्शविण्याचे आवाहन ग्रामविकास युवा परिवर्तन मंच इटखेडा द्वारे करण्यात आले आहे.



