37.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home शैक्षणिक स्कॉलर प्री. प्रायमरी स्कूल, सहारवानी येथे दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन

स्कॉलर प्री. प्रायमरी स्कूल, सहारवानी येथे दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन

0
26

blank

गोरेगाव-  पाथ फाईन्डर शिक्षण संस्था, गोंदिया द्वारा संचालित स्कॉलर प्री. प्रायमरी स्कूल, सहारवानी येथे दिनांक ७ व ८ जानेवारी २०२३ ला दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या उद्घाटिका सौ. लीनता लोखंडे, मुख्यध्यापक, एम.सी.पी. स्कुल, गोरेगाव , कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. सचिन मेश्राम , सरपंच -ग्राम पंचायत सहारवानी , प्रमुख अतिथी डा. अमोल श्यामकुवर,हिरालाल पटले (से.नि. मुख्याध्यापक),मुख्याध्यापक आर.वाय.कटरे, मा. बोरकर (मुख्याध्यापक, वरिष्ठ प्राथमिक शाळा, सहारवानी),पोलीस पाटील तेजलाल पटले,  सुरेशभाऊ नेवारे अध्यक्ष, त. मु.स.,सहारवानी,विनोद गौतम,रंजूताई रंगारी, आरोग्य सेविका सहारवानी यांच्या उपस्थितीत स्नेहसंमेलनाच्या उदघाटन सोहळा संपन्न झाला.
या स्नेहसंमेलना मध्ये विद्यार्थ्यांकरिता विविध एकल व सांघीक खेळांचे आयोजन करण्यात आले . तसेच विध्यार्थुयांमध्ये गुणात्मक सांस्कृतिक बदल घडावा या हेतून विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे अजोजन करण्यात आले , ज्यात नृत्य स्पर्धा, गीतगायन स्पर्धा, कोण बनेगा स्कॉलर , नाटिका आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये सर्व विध्यार्थ्यानी सहभाग नोंदविला.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात शाळेच्या प्राचार्य सौ. शीतल धर्मवीर चौहान यांच्या मार्गदर्शनात शाळेच्या शिक्षिका सौ.. मीना दिलीप पटले, सौ. रजनी भावे , सौ .भारती उईके तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी सौ. कल्पना चौहान आणि सौ. पूजा भावे यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या प्राचार्य -सौ. शीतल चौहान यांनी तर सूत्रसंचालन ओजस चौहान यांनी व आभार प्रदर्शन सौ. मीना पटले यांनी केले

blank