27.4 C
Gondiā
Tuesday, August 25, 2026
Home विदर्भ ओबीसी जनगणना नाकारणारे आ. बावनकुळे यांचा निषेध

ओबीसी जनगणना नाकारणारे आ. बावनकुळे यांचा निषेध

0
29

भंडारा- भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी ओबीसी जनगणना कायद्यात नाही, असे विधान करुन ओबीसी बांधवांच्या भावना दुखावल्या. याबाबत ओबीसी सेवा संघाच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन आ. बावनकुळे यांचा निषेध करण्यात आला.
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांना आरक्षण मिळते. त्यामुळे त्यांची जनगणना होते. मंडल आयोग विरुद्ध इंद्रा सहानी केसनंतर ओबीसींना २७ टक्के आरक्षण देशात आले आहे. त्यामुळे ओबीसींची जनगणना होणे गरजेचे आहे. तत्कालिन गृहमंत्री व भाजपचे राष्ट्रीय नेते राजनाथ सिंग यांनी ओबीसींची जनगणना करणार, असे आश्‍वासन दिले होते. परंतु, नित्यानंद रॉय यांनी ओबीसींची जनगणना करणार नाही, असे जाहीर केले.
१९३१ च्या जनगणनेनुसार ओबीसी समाजाची लोकसंख्या ५२ टक्के होती. भारतीय संविधानाच्या कलम ३४0 नुसार ओबीसींची जनगणना अध्यावत करणे आवश्यक आहे. परंतु, भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यामुळे ओबीसी समाजाची दिशाभूल होत आहे. याबाबत ओबीसी सेवा संघाच्या वतीने त्यांचा निषेध करण्यात आला.
यावेळी ओबीसी सेवा संघाचे गजानन पाचे, गोपाल सेलोकर, दयाराम आकरे, रमेश शहारे, संजीव बोरकर, वामन गोंधूळे, भय्याजी लांबट उपस्थित होते.