34.7 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील कर्मचारी दोन महिन्यापासून वेतनाविना

तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील कर्मचारी दोन महिन्यापासून वेतनाविना

0
80

blank

गोंदिया,दि.12ः– जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जिल्हा परिषदेने तालुकास्तरावर तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय सुरु केले असले तरी या कार्यालयातील कर्मचारी वर्गाला गेल्या दोन महिन्यापासून वेतनच न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.यासंदर्भात आज(दि.12)जिल्ह्यातील तालुका अधिकारी कार्यालयातील कर्मचारी वर्गाने एकत्र येत मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन सादर करीत तत्काळ वेतन देण्याची मागणी केली आहे.आँक्टोंबर 2022 चे वेतन दिवाळीपुर्वी देण्यात आले.मात्र नोव्हेंबरपासूनचे वेतन जानेवारी लागूनही देण्यात न आल्याने आमच्या कुटुबियांचा उदरनिर्वाह कसा करायचा अशा प्रश्न निवेदनातून कर्मचारी वर्गाने विचारला आहे.

blank