24.5 C
Gondiā
Friday, August 21, 2026
Home गुन्हेवार्ता 13 वर्षाच्या मुलीला फ्लाइंग किस करणार्‍या तरुणावर गुन्हा दाखल

13 वर्षाच्या मुलीला फ्लाइंग किस करणार्‍या तरुणावर गुन्हा दाखल

0
43

गोंदिया : शहरातील शंकर चौक परिसरातील एस.बी. पार्लर समोरून जाणार्‍या एका 13 वर्षीय विद्यार्थिनीला 30 वर्षीय कारचालकाने अश्लील शब्दात बोलून फ्लाइंग किस केला.तिच्या वर्गमित्रांच्या समोर हा प्रकार घडला. मुलीने सदर प्रकरण आपल्या आईला सांगितले. ही घटना शुक्रवार, 13 जानेवारीला सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली.

शहरातील 13 वर्षीय विद्यार्थिनी आपल्या शिकवणी वर्गामधून वर्ग मित्र-मैत्रिणींसोबत घरी परत येत असताना कारचालक तरुणाने तिला ‘कार मे बैठ, डेट पे चल’ असे बोलत अपशब्दांचा वापर केला. तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यावर पुन्हा काही अंतरावर जावून त्याने थांबून पुन्हा रस्त्याने जाणार्‍या त्या मुलीला फ्लाइंग किस केले. यावर त्या मुलीने आरडाओरड केली असता गर्दी जमा झाली. गर्दी होत असल्याचे पाहून आरोपी कार घेवून पसार झाला.मुलीने या प्रकरणाची माहिती आपल्या आईला दिली. आईच्या तक्रारीवरून त्या अज्ञात आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम 374 (अ), सहकलम 12 लैंगिक अत्याचार अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला आहे.