गोंदिया-गोंदिया जिल्हा पोलिस दलातील २२ चालक व १७२ पोलिस शिपाई असे १९४ पदासाठी २ जानेवारीपासून भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात कागदपत्र पडताळणी, मापदंड व मैदानी चाचणी घेतली जात आहे. दरम्यान जिल्हा पोलिस दलाकडून (ता.१४) पर्यत ७८३७ उमेदवारांची चाचणी घेण्यात आली. यातील ६३३८ उमेदवार पुढील प्रक्रियेसाठी पात्र ठरले आहेत.२ जानेवारीपासून सुरू असलेल्या भरती प्रक्रियेचा आज, १३ वा दिवस आहे. दरम्यान ९९७६ उमेदवारांना मैदानी चाचणीकरीता बोलविण्यात आले होते. यातील १८७७ उमेदवार गैर हजर राहिले आहेत.
जिल्हा पोलिस दलातील २२ चालक पदाकरीता १0४१ तर १७२ पोलिस शिपाई पदाकरीता १३६३५ उमेदवारांनी अर्ज केले होते. एकूण १९४ पदासाठी १४६७६ अर्ज आले. २ जानेवारीपासून कारंजा पोलिस मैदानात भरती प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. पहिल्या फेरीत चालक पदाच्या उमेदवारांना तर दुसर्या फेरीत महिला उमेदवारांना तर १0 जानेवारीपासून सर्व उमेदवारांना चाचणी परिक्षेकरीता बोलविले जात आहे. यात आजपावेतो ९९७६ उमेदवारांना चाचणी परिक्षेसाठी बोलविण्यात आले होते. त्यातील ७८३७ उमेदवार हजर राहिले. कागदपत्र पडताळणी, उंची, छाती, मापदंडासह, गोळा फेक, दौड व इतर मैदानी चाचण्या घेण्यात आल्या. यामध्ये पुढील प्रक्रियेकरीता १३ दिवसाच्या चाचणीत ६३३८ उमेदवार पुढील प्रक्रियेसाठी पात्र ठरले आहेत. ही भरती प्रक्रिया १८ जानेवारीपयर्ंत सुरू राहणार आहे. यामुळे आगामी भरती प्रक्रियेत आणखी ४६00 हून अधिक उमेदवारांची चाचणी प्रक्रिया होणार आहे.
जिल्हा गोंदिया
————————————-
आज दिनांक- १४/०१/२०२३ पोलीस भरती प्रक्रिया बाबत मुद्देनिहाय माहिती
————————————
पदाचे नाव – पोलीस शिपाई –
१) आज रोजी भरती करीता बोलवण्यात आलेल्या एकूण उमेदवारांची संख्या =
११९९
२) आज रोजी भरती करीता गैरहजर उमेदवार- २४८
३) आज रोजी भरती करीता हजर उमेदवार – ९५१
४) अपात्र उमेदवार बाबत माहिती–
——————————-
अ) कागदपत्र पडताळणी अंती अपात्र उमेदवार- ०४
ब) उंची मध्ये अपात्र उमेदवार एकुण = १२१
क) पोलीस शिपाई (पुरुष) छाती मध्ये अपात्र उमेदवार – ३९
एकूण अपात्र उमेदवार – १६४
५) आज रोजी शारीरीक चाचणी करीता पात्र एकूण उमेदवार – ७८७





