24.5 C
Gondiā
Friday, August 21, 2026
Home विदर्भ चिचगड येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष उत्साहात साजरा

चिचगड येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष उत्साहात साजरा

0
72

देवरी,दि.१५- मकर संक्रांतीचे औचित्य साधून तालुक्यातील चिचगड येथे कृषी विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष काल शनिवारी (दि.१४) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी चिचगडचे मंडळ कृषी अधिकारी देवेंद्र बेलेकर हे होते.याप्रसंगी कृषी अधिकारी सुरेश धांडे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात उपस्थित शेतकऱ्यांना श्री धांडे यांनी तृणधान्याचे पोषण मूल्ये व आहारातील महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. श्री बेलेकर यांनी पौष्टिक तृणधान्य कोदो, कुटकी आणि नाचणीच्या क्षेत्र विस्तारासंबंधाने सविस्तर चर्चा आणि शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण केले. याशिवाय कृषी सहाय्यक सुरेंद्र हूळे, सचिन गावळ, बालकदास जांभूळकर आदी कर्मचाऱ्यांनी विभागाच्या विविध योजने विषयी माहिती देऊन माहिती पत्रकांचे वाटप केले.

या शिबिराला चिचगडचे ग्रामपंचायत सदस्यांसह चिचगड, पिपरखरी,सुंदरी,मोहांडी व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.