गोंदिया- जिल्ह्यातील सर्व अवैध धंद्यांवर कारवाई करुन अवैधरीत्या चालणारे अवैध दारू, जुगार धंद्यावर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे यांनी दिले होते.त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांचे आदेशान्वये, उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया सुनील ताजने यांच्या मार्गदर्शनात गोंदिया ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक अजय भुसारी यांचे नेतृत्वात टेमणी येथे अवैधरित्या तास पत्त्यावर पैसे लावून जुगार खेळणाऱ्यांवर 14 जानेवारीला सायकांळी छापामार कारवाई करुन 3 लाख 63 हजार 615 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या छापामार कार्रवाई दरम्यान 12 इसम जुगार खेळत असताना मिळून आले. यामध्ये 1615 रु नगदी, 7 मोटार सायकल किंमत 3,25,000 रु व 4 मोबाईल किंमत 37,000 रु, असा एकूण किंमती 3,63,615/-रुपयाचा मुद्देमाल मिळून आल्याने जप्त करण्यात आले आहे.तसेच नरेंद्र जतपेले, टेमणी,धरमदास मंडीये चुलोद, निलेश कोसरकार श्रीनगर, गोंदिया,ताराचंद ठाकूर बरबसपुरा,सचिन मेश्राम छोटा गोंदिया,सुनील धोंडे, विजय नगर गोंदिया,महेंद भलावी टेमणी,दिलीप धावडे चुलोद,आशिष उके संजयनगर गोंदिया, आकाश भिमटे छोटा गोंदिया,जलिंग दमाहे बरबसपुरा, राजन लिल्हारे टेमणी यांच्याविरुध्द पो. ठाणे गोंदिया ग्रामीण येथे कलम 12(अ ) मुंबई जुगार कायदा प्रमाणे अप. क्र.18/2023 गुन्हा नोंदविण्यात आले आहे.
सदरची कामगिरी वरिष्ठांचे निर्देश व आदेशा प्रमाणे पोलीस निरीक्षक भुसारी ,सपोनि .चव्हाण पोलीस अंमलदार स. फौं . मल्लेवार, गणवीर, पोहवा डिब्बे, बाहेकार, ना. पो का नेवारे, बनोटे, कटरे ,चालक पो. हवा रामटेके यांनी केली.





