36 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home क्रीडा भारतीय सैन्य दिवस निमित्ताने आयोजित मॅराथानमध्ये ष्ठ नागरिकांसह, युवक,युवती सहभागी

भारतीय सैन्य दिवस निमित्ताने आयोजित मॅराथानमध्ये ष्ठ नागरिकांसह, युवक,युवती सहभागी

0
26

blank

तुलसीदास भुजाडे/आमगाव :-भारतीय सैन्य दिवसाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त आमगाव मित्र परिवार यांच्या वतीने एक दौड भारत के नाम स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत अनेक नागरिक सहभागी झाले होते.
कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाचे संयोजक संतोष दुबे, यशवंत मानकर, अजय खेतान, भोला गुप्ता, यांच्या उपस्थितीत भारत माता यांच्या प्रतिमेचे पूजन करून व राष्ट्रपिता महात्मा गांधी याना माल्यार्पण करून द्विप प्रज्वलित करून करण्यात आली.

दौड स्पर्धेची सुरुवात सेवानिवृत्त सैनिक यांच्या हस्ते हिरवी झंडी दाखवून गांधी चौकातुन करण्यात आली. दौड स्पर्धेत १६ ते ३०वर्ष वयोगटातील प्रथम पुरस्कार विजय रोशन चुटे,द्वितीय पुरस्कार एकनाथ प्रकाश हत्तीमारे, तिसरा पुरस्कार कुणाल बब्बीकुमार गायधने यांनी पटकाविला.३० ते ५० वर्षे वयोगटात प्रथम क्रमांक संजय मंगरूलाल मक्षिरके,द्वितीय आसिफ लतीफ कुरेशी, तिसरा क्रमांक नरेंद्र तुलसीदास दसरिया यांनी पटकाविला.50 वर्षे पेक्षा जास्त वयोगटातील दौड स्पर्धेत प्रथम क्रमांक श्रीचंद चौधरी ,दुसरा क्रमांक परमेश्वर महारवाडे,तिसरा क्रमांक माणिकलाल धुर्वे यांनी पटकावले.
महिला वर्ग दौड स्पर्धेत अनिशा राधेश्याम रहिले प्रथम ,हर्षा अतोष रहांगडाले द्वितीय, रिया चंद्रकांत शिंगाडे तिसरा क्रमांक पटकावला.
सर्व विजयी स्पर्धकांना जयप्रकाश शिवणकर,संजय बहेकार,योगेश असाटी, हरिहर मानकर, सुभाष पांडे ,डॉ. श्रीकांत राणा,सोनू मेंढे,आशिष माहेश्वरी,विष्णू अग्रवाल, पंकज असाटी, मोना जैन,संभूदयाल अग्रीका ,अमोल कोठारी,अभिषेक माहेश्वरी, मनीष असाटी ,जयश्री पुंडकर यांच्या हस्ते अनुक्रमे २५००₹,१५००₹,११००₹ नगद,स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
आयोजित कार्यक्रमात सैन्य दिना निमित्त भारतीय लष्करातील सेवानिवृत्त सैनिक यांचा सन्मान समाजसेवी प्रमोद कटकवार,डॉ. लीलाधर कलंत्री,डॉ.साजिद खान, डॉ.श्रीकांत राणा द्वारा पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रम चे संचालन ,प्रस्थावना एवं आभार यशवंत मानकर,अजय खेतान यांनी केला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय बाहेकर, रितेश चुटे,राजीव फुंडे,हर्षल मानकर,समीर सरकार,विकास शर्मा,आनंद शर्मा,पंकज असाटी, बाळाराम व्यास, हेमंत चावके, उत्तम नंदेश्वर, विश्वास चौहान, अतुल चौहान, अमित हेमने, प्रशांत मेंढे, गज्जू फुंडे ,प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी, पोलिस विभागाचे कर्मचारी यांनी सहयोग दिला.

blank