24 C
Gondiā
Thursday, August 13, 2026
Home क्रीडा क्रीडा प्रबोधिनी प्रवेशासाठी हँडबॉल चाचणी 17 ऑगस्टपासून

क्रीडा प्रबोधिनी प्रवेशासाठी हँडबॉल चाचणी 17 ऑगस्टपासून

0
2

तर खेळनिहाय कौशल्य चाचणी 18 ऑगस्टपासून

गोंदिया, दि.13 :  वर्ष २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेशासाठी हँडबॉल खेळाची राज्यस्तर सरळ प्रवेश प्रक्रिया व खेळनिहाय कौशल्य चाचणी नागपूर येथील विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर कोराडी रोड, नागपूर येथे आयोजित करण्यात आली आहे.

         राज्यस्तर सरळ प्रवेश प्रक्रिया १७ व १८ ऑगस्ट २०२६ रोजी होणार असून, १७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता चाचणीला सुरुवात होईल. तसेच खेळनिहाय कौशल्य चाचणी १८ व १९ ऑगस्ट २०२६ रोजी होणार असून, १८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता चाचणी सुरू होईल.

         या प्रक्रियेसाठी खेळाडू १९ वर्षांखालील वयोगटातील असणे आवश्यक आहे. राज्यस्तर सरळ प्रवेशासाठी राज्यस्तर पदक किंवा राष्ट्रीय स्तरावरील सहभाग प्रमाणपत्र आवश्यक असून, खेळनिहाय कौशल्य चाचणीसाठी किमान राज्यस्तर सहभाग प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.

         चाचणीसाठी येणाऱ्या खेळाडूंनी प्राविण्य किंवा सहभाग प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड, वयाचा पुरावा यासह सर्व आवश्यक कागदपत्रे मूळ स्वरूपात आणावीत. तसेच स्वतःचे स्पोर्ट्स किट सोबत आणणे आवश्यक आहे. निवास व भोजनाची व्यवस्था खेळाडूंना स्वतःच्या स्तरावर करावी लागणार आहे. जिल्ह्यातील खेळाडूंनी क्रीडा प्रबोधिनीमध्ये हँडबॉल तसेच खेळ निहाय कौशल्य चाचणीसाठी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी लक्ष्मीकांत यादव यांनी केले आहे.

blank