सडक अर्जुनी,दि.16ः- तहसील अंतर्गत येणार्या सौदड येथे दरवर्षी प्रमाणे रविवार 15 जानेवारीला गोवारी स्मारक फुटाळा स्थित भव्य पटांगणावर डॉ.अश्विनी अशोक लंजे व मित्र परिवारतर्फे लहान मुलांकरिता पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पतंग महोत्सव मागील 5 वर्षा पासुन नियमित मकरसंक्रांतीला आयोजित करण्यात येते. या महोत्सवामध्ये 100 हून अधिक मुलांनी सहभाग घेत पतंग उडविण्याचा आनंद लुटला.त्यानंतर कार्यक्रमात सहभागी सर्व मुलांना बक्षीस व अल्पोहार देण्यात आले.





