34 व्या रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रमाचे आयोजन
स/अर्जूनी(16 जानेवारी)-संपूर्ण भारतात दररोज 450 मोटार अपघात होतात. दुर्दैवाने त्यात 200 अपघात ग्रस्त मृत्यूमुखी पडतात.सडक अर्जूनी तालुक्यातील आदिवासी विकास हायस्कूल व कला,विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय खजरी/डोंगरगाव सह बर्याच शाळा हायवे ला लागून सूरू आहेत.
सर्वच विद्यार्थी हायवेवरून आपल्या साधनानी स्वतःच्या घरून शाळेत येणे जाने करतात.अर्थात सर्व विद्यार्थ्यांनी वाहतूकीचे नियम अंगीकारूनच शाळेत येणे जाने करने अनिवार्य आहे.अपघात नैसर्गिक, मानवी चूक व यांत्रिक चूक या मुख्य कारणांमुळेच होत असतात.रस्ता ओलांडावा,वाहनानी प्रवास करतांना मोबाईल मार्फत बोलने टाळावे. मोटार सायकल चालवितांनी, वाहन परवाना आपल्याकडे आहे याची खातरजमा करूनच हेल्मेट चा वापर करूनच वाहन चालवावे.नविन नियमा अन्वये पायी चालनार्यांनी स्वतःच्या उजव्या बाजूने चालावे.अपघात स्थळी पोलीस कार्यवाहीला न घाबरता ,108 किवा 112 क्रमांक डायल करून सम्बंधित विभागाला माहीती द्यावी.कारण माननीय सुप्रीम कोर्टाने अपघाताची माहीती देणार्या व्यक्तीवर यानंतर कोणतीच कारवाई होणार नसल्याचे परीपत्रक निर्गमित केलेले आहे.
अर्थात सर्व विद्यार्थ्यांनी सडक सुरक्षा -जिवन रक्षा हे ब्रीद वाक्य मनावर बिबंवूनच रस्त्यावरून प्रवास करावा असे प्रतिपादन इन्सीडेंट मॅनेजर सुभाष ठाकरे यांनी केले.अशोका हायवे भंडारा लिमिटेड टोल प्लाझा सेंदुरवाफा च्या वतिने ता.16 जानेवारी,सोमवारी रस्ता सुरक्षा सप्ताह निमीत्त आदिवासी विकास हायस्कूल व कला,विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय खजरी/डोंगरगाव येथे आयोजित कार्यक्रमात ते मुख्यमार्गदर्शक म्हणून बोलत होते.अध्यक्षस्थानी प्राचार्य खुशाल कटरे होते.प्रास्ताविक अॅडमीस्टेर्शन विभागाचे एच.आर नरेंद्र पराते यांनी प्रस्तुत केले.विचार मंचकावर प्रेट्रोलींग ऑफिसर रामलाल मानकर व सत्यजित गजभीए उपस्थित होते.संचालन व आभार प्रा.सुरज रामटेके यांनी मानले.





