31.2 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ राष्ट्रीय महामार्गावरील अनधिकृत वाहने हटवा

राष्ट्रीय महामार्गावरील अनधिकृत वाहने हटवा

0
17

blank

सुरेश भदाडे
देवरी,दि.२१-येथून जाणाèया राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ चे चौपदरीकरणात रुपांतर होऊनही अपघातांचे प्रमाण काही कमी होत नाही.त्यातच मुख्य मार्गावर नगरपंचायत क्षेत्रात अनधिकृतरित्या रस्त्यावर वाहने उभी राहतात.त्यामुळे इतर वाहनांना अडचणी होत असून वाहनचालकांना समोरचे दिसत नाही व अपघात होतो,त्यामुळे मुख्य मार्गावर अनधिकृत वाहने उभी करणाèयावर कारवाई करण्यासबंधीचे निवेदन आज देवरीतील नागरिकांनी उपविभागीय अधिकारी यांना दिले.त्यातच पेट्रोलपंप,राणी दुर्गावती चौक,नगरपंचायत समोरील भाग,पंचायत समिती,आमगाव व चिचगड मार्गावर अनेक ठिकाणी वाहने अनधिकृतपणे उभी असतात,त्यामुळे या मार्गावर जाणाèया येणाèया नागरिकांंना त्रास होऊन परिणामी जीव गमावण्याची वेळ आली आहे.त्यामुळे अशा वाहनावर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी राजू शाहू,नेमीचंद आंबीलकर,हेमलता कुंभरे,नगरसेवक यादोराव पंचमवार,माया निर्वाण,नगराध्यक्ष सुमन बिसेन,कृष्णदास चोपकर,बंटी भाटिया,समाजसेवक कुलदीप लांजेवार,रतिराम दरवडे,चेतन उईके व अनिलकुमार येरणे यांनी निवेदनातून केली आहे.

blank