42.5 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home विदर्भ जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी डॉ. फुके

जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी डॉ. फुके

0
49

blank

गोंदिया-महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती अधिनियमातंर्गत गोंदिया जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून माजी आमदार डॉ.परिणय फुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती राज्य शासनाच्या नियोजन विभागाकडून करण्यात आली असून या संदर्भात २0 जानेवारी २0२३ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. डॉ.परिणय फुके यांची नियुक्ती पुढील आदेशापयर्ंत अबाधित राहिल, अशा सुचना समितीच्या अध्यक्षांना देण्यात आले आहेत.
जिल्हा विकासाच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाच्या असलेल्या जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून माजी विधान परिषद सदस्य डॉ.परिणय फुके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ.फुके यांची नियुक्ती पुढील आदेशापयर्ंत अबाधित राहिल, अशा सुचनाही करण्यात आल्या आहेत.

blank