31.2 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home Top News अमरावतीत मोठा शस्त्रसाठा जप्त;एकाच कुटुंबातील 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अमरावतीत मोठा शस्त्रसाठा जप्त;एकाच कुटुंबातील 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

0
39

blank

अमरावती- शस्त्रसाठाप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे.अमरावतीच्या दर्यापुरातील मोमीन पुरा भागातून एकाच कुटुंबातील 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. पोलिसांनी 9 तलवारी, 3 फरशा, 1 गुप्ती आणि काही शस्त्र बनविण्याची साहित्य जप्त केली आहेत. दर्यापूर पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे.

जुन्या दर्यापूर शहरात असलेल्या मोमीनपुरा या भागातून दर्यापूर पोलिसांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. याप्रकरणी एकूण तीन जणांना अटक केली आहे. या परिसरात पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरापर्यंत सर्च ऑपरेशन सुरु होतं.

blank