40.6 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ प्रतिस्पर्धी उमेदवार एकाच मतदान केंद्रावर, घेतली गळाभेट

प्रतिस्पर्धी उमेदवार एकाच मतदान केंद्रावर, घेतली गळाभेट

0
31

blank

नागपूर : निवडणुकीत रिंगणात असलेले राजकीय पक्षाचे उमेदवार एकमेकांचा चेहराही पाहत नाहीत. परस्परांना भेटतही नाहीत. मात्र जेव्हा निवडणूक शिक्षकांची असते तेव्हा उमेदवार असले तरी त्यांच्यातला शिक्षक जागा असतो आणि असेच एक चित्र आज शहरातील मोहता सायन्स कॉलेजच्या मतदान केंद्रावर पाहायला मिळाले.

भाजपने पाठिंबा दिलेले महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे उमेदवार आणि विद्यमान आमदार नागो गाणार, तसेच महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेले विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सुधाकर अडबाले जेव्हा मतदान केंद्रावर समोरासमोर आले तेव्हा दोघांनी एकमेकांची भेटच घेतली नाही तर एकमेकांना शुभेच्छा देत गळाभेट घेतली.

blank