38.6 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ अभियंता मेश्राम यांचा पाण्यात बुडून मृत्यू

अभियंता मेश्राम यांचा पाण्यात बुडून मृत्यू

0
19

देवरी : रंग खेळल्यानंतर मित्रांसोबत आंघोळीसाठी आलेल्या शिलापूर येथील वाघ नदीघाटातील पाण्यात बुडून धीरज गोपाल मेo्राम (२७), या अभियंत्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवार, २४ मार्च रोजी सकाळी ११.३0 वाजतादरम्यान घडली.

देवरी येथील गोंडवानानगरातील रहिवासी आणि नव्यानेच गडचिरोली येथील बांधकाम विभागात अभियंतापदावर रुजू झालेले धीरज मेश्राम घटनेच्या दिवशी आपल्या दोन मित्रांसोबत शिलापूर वाघनदीच्या घाटावर गेले.
धीरज यांनी नदीपात्रात उडी घेतली. यानंतर काही वेळ लोटल्यावरही ते बाहेर आले नाही. त्यामुळे मित्रांनी याची माहिती नातेवाईक व देवरी पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी परिसरातील मासे पकडणार्‍यांच्या मदतीने नदीपात्रात धीरजचा शोध घेतला असता, मृतदेह घटनास्थळापासून अडीचशे मीटर लांब अंतरावर एका दगडाजवळ आढळला. त्यांच्या पश्‍चात वडील, एक भाऊ आणि एक बहीण आहे. गुरुवारी शोकाकूल वातावरणात धीरजवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

blank