कर्जबाजारी शेतकर्‍याची आत्महत्या

0
10

 भंडारा : कर्जाची परतफेड कशी करणार? या विवंचनेत असलेल्या मुरलीधर गोविंदा कावळे (४८) या शेतकर्‍याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना २४ मार्च रोजी मंडईपेठ, अड्याळ येथे धूलिवंदनाच्या दिवशी घडली.

अत्यल्प शेती असलेल्या मुरलीधर कावळे यांच्याकडे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे ८0 हजार रुपयांचे कर्ज होते. गेल्या खरीप हंगामात त्यांनी कर्जाची उचल केली होती. याशिवाय त्यांनी काही लोकांकडून सुमारे ३ लाख रुपये उसणवार घेतले होते. गेल्या वर्षीच्या खरीप आणि नंतरच्या रब्बी हंगामात त्यांना नापिकीचा सामना करावा लागला. उत्पादन झाले नसल्याने त्यांनी कर्जाची परतफेड केली नव्हती. शिवाय, उसणवार घेतलेली रक्कमही परत केली नाही. कावळे गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात होते.