41.9 C
Gondiā
Tuesday, June 16, 2026
Home Top News मुंबईत बीकेसी इथल्या एमएमआरडीए मैदानावर आयोजित दिव्य कला मेळा 2023 ची दिमाखदार...

मुंबईत बीकेसी इथल्या एमएमआरडीए मैदानावर आयोजित दिव्य कला मेळा 2023 ची दिमाखदार कार्यक्रमाने सुरुवात

0
25

दिव्यांगजनांनी तयार केलेल्या उत्पादनांची विक्री करण्यासाठी मुंबईत आयोजित दिव्य कला मेळा 2023 चे केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री वीरेंद्र कुमार यांच्या हस्ते उद्घाटन

आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीत दिव्यांगजनांची भूमिका महत्त्वाची असल्याचे केंद्रीय मंत्री वीरेंद्र कुमार यांचे प्रतिपादन

दिव्य कला मेळा हा दिव्यांगजन कारागीर, उद्योजक आणि कलाकारांना त्यांचे कौशल्य आणि उत्पादनांच्या विपणनासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा उपक्रम आहे: केन्द्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले

मुंबई , 17 फेब्रुवारी, 2023

दिव्यांगजनांना सर्वतोपरी मदत केली जाईल असे आश्वासन, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री वीरेंद्र कुमार यांनी दिले असून, आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीमध्ये अपंगांची भूमिका असल्याचे त्यांनी म्हटले आहे. संपूर्ण देश आत्मनिर्भर भारताच्या दिशेने वाटचाल करत असून दिव्यांगजनांना स्वावलंबी बनविल्याशिवाय हे ध्येय गाठता येणार नाही, असे ते म्हणाले.

केंद्रीय मंत्री वीरेंद्र कुमार यांनी आज (16 फेब्रुवारी 2023) मुंबईत वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स इथल्या एमएमआरडीए मैदान क्रमांक-1 इथे आयोजित दिव्य कला मेळा 2023 चे उद्घाटन केले. त्यावेळी ते बोलत होते. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले आणि लोकसभेचे खासदार गोपाळ शेट्टी देखील यावेळी उपस्थित होते.

blank

blank

उद्घाटन समारंभाला संबोधित करताना डॉ. वीरेंद्र कुमार म्हणाले की, दिव्यांगजनांमधील उद्योजकता आणि कारागिरीला चालना देण्यासाठी, केंद्र सरकारने अनेक योजना आखल्या आहेत. दिव्यांगजन  बंधू-भगिनींचे प्रशिक्षण, कौशल्य विकास आणि त्यांना वित्तपुरवठा करण्यासाठी या योजना राबवल्या जातात, असेही ते म्हणाले.

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले म्हणाले की, दिव्यांगजनांनी बनवलेल्या उत्पादनांना बाजारपेठ निर्माण करण्यासाठी दिव्य कला मेळा हा उपक्रम आहे. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने दिव्यांगजन कारागीर, उद्योजक आणि कलाकारांना त्यांच्या कौशल्यांचे आणि उत्पादनांचे विपणन करण्यासाठी आणि त्याद्वारे त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे, असेही ते म्हणाले. दिव्यांगजनांना विशेष क्षमता आणि प्रतिभेची ईश्वरी देणगी मिळालेली असते, आणि ती त्यांच्या  कलात्मक कौशल्यातून प्रकट होते, असे ते म्हणाले. देश बदलत आहे, त्याबरोबरच दिव्यांगांबाबतच्या समाजाच्या विचारप्रक्रियेतही सकारात्मक बदल घडत आहे, असे राज्यमंत्री डॉ. आठवले म्हणाले.

blank

blank

या प्रदर्शनात जवळजवळ 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील सुमारे 200 दिव्यांगजन  कारागीर, कलाकार आणि उद्योजक त्यांची उत्पादने आणि कौशल्ये प्रदर्शित करत आहेत. घराची सजावट आणि जीवनशैली उत्पादने, कपडे, स्टेशनरी आणि पर्यावरणपूरक उत्पादने, खाद्यपदार्थ आणि सेंद्रिय उत्पादने, खेळणी आणि भेटवस्तू, दागिने यासारख्या वैयक्तिक वापराच्या वस्तू, हे  या प्रदर्शनाचे  प्रमुख आकर्षण आहे.  दिव्य कला मेळा 2023 मध्ये, जम्मू-काश्मीर आणि ईशान्येकडील राज्यांसह देशाच्या विविध भागांमधील हस्तकला, हातमाग, भरतकाम आणि खाद्यपदार्थांसह विविध उत्पादने प्रदर्शित करण्यात आली आहेत.

दिव्य कला मेळा 25 फेब्रुवारी 2023 पर्यंत मुंबईत बीकेसी मधील एमएमआरडीए मैदानावर आयोजित करण्यात आला आहे आणि सर्व दहा दिवस सकाळी 11.00 ते रात्री 9.00 या वेळेत तो नागरिकांसाठी खुला राहील. या मेळ्यात विविध दिव्यांगजन कलाकार आणि नामवंत व्यावसायिक कलाकारांच्या सादरीकरणासह सांस्कृतिक उपक्रमांची मालिका असेल. या मेळ्याला भेट देणाऱ्यांना देशाच्या विविध प्रांतामधील त्यांच्या आवडत्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येईल.

blank

blank

भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाचा, दिव्यांगजन (अपंग व्यक्ती) सक्षमीकरण विभाग, देशातील दिव्यांगजन व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवितो. दिव्यांगजनांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी एनएचएफडीसी कर्जाच्या स्वरूपात आर्थिक सहाय्य पुरवते.  दिव्यांगांना बाजारपेठेचे सहाय्य मिळवून देण्याच्या हेतूने त्यांना देशभरात भरणाऱ्या मेळावे आणि प्रदर्शनामध्ये विक्रीसाठी विनामूल्य जागा म्हणजे स्टॉल्स दिले जातात.

दिव्यांगजनांची उत्पादने, उत्पादनांचे ब्रॅण्डिंग व विकास आणि बाजारपेठेचे इतर फायदे मिळवून देण्याच्या दृष्टीने अशा प्रकारचे मेळावे महत्त्वाची भूमिका बजावतात. अशा प्रसिद्ध मेळाव्यांना लोक मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे दिव्यांगाकडील कौशल्ये लोकांपर्यंत पोहोचवण्यास  मदत होते.  गेल्या काही वर्षांपासून दिव्यांगजन  सक्षमीकरण विभाग  NHFDC च्या सहाय्याने फक्त दिव्यांग जनासाठी असलेले मेळावे आयोजित करत आहे. दिव्य कला मेळा असे या मेळाव्यांचे नामकरण केले आहे

दिव्यांग सक्षमीकरण विभागाने  डिसेंबर 2022 मध्ये नवी दिल्लीतील ऐतिहासिक कर्तव्य पथावर दिव्य कला मेला आयोजित केला होता. त्याला भेट देणाऱ्या लाखो लोकांनी दिव्यांगांनी तयार केलेल्या कलाकुसरीच्या वस्तू तसेच उत्पादने यांची प्रशंसा केली होती. अशा प्रकारचे मेळावे दिव्यांग बंधू भगिनींसाठी दरवर्षी आयोजित करून ते फक्त दिल्ली मुंबई सारख्या मोठ्या शहरांपुरते मर्यादित न  ठेवता भविष्यात सर्व देशभरात घेण्याचे विभागाचे नियोजन आहे. मुंबईनंतर भोपाळ येथे  मार्च 2023 मध्ये दिव्य कला मेळा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा देशभरात दहा वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करण्यात येईल.