जळीत कांडातील पाचवर्षीय मुलावर सुर्याटोला येथेच अंत्यसंस्कार,तर आरोपीला 20 पर्यंत पोलीस कोठडी

0
22

गोंदिया- येथील रामनगर पोलीस ठाणेंतर्गत येत असलेल्या सुर्याटोला येथे बुधवारच्या रात्री पेट्रोल घालूनच वडिलांने पत्नी,मुलासह सासर्याला जाळल्याची घटना घडली होती.या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवून आरोपी किशोर शेंडेला मुळगाव भिवापूर येथून तिरोडा पोलीस ठाण्यातील स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने सायकांळच्या सुमारास रामनगर पोलिसांनी अटक केली होती.अटकेनंतर पोलिसांच्या तपासात आपणच पेट्रोल घातल्याची कबुली आरोपी किशोर शेंडे यांनी दिली होती.

अटकेनंतर ताब्यात घेत आज न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने 20 फेबुवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती रामनगरच पोलीस निरिक्षक संदेश केंजळे यांनी दिली..दरम्यान उपचार सुरु असतानाच बुधवारच्या रात्री मुलगा जय किशोर शेंडे(वय 5 रा.भिवापूर,ता.तिरोडा) हा 90 टक्के जळाल्याने त्यांला नागपूर येथील रुग्णालयात उपचाराकरीता हलविण्यात आले होते.उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला.मृत्यूनंतर आज गुरुवारला सायकांळी 4 वाजेच्या सुमारास सुर्याटोला येथील घाटावरच त्या मुलावर अंत्यसंस्कार करण्यात आले.या अंत्यसंस्कारादरम्यान मृतक मुलाचे पैतुक गाव असलेल्या भिवापूर येथील कुणीही आले नसल्याची माहिती उपस्थितांनी दिली.घटनेनंतर संपुर्ण परिसरात शोकाकूल वातावरण असून आरोपीची पत्नी सुध्दा मृत्यूशी झुंज देत आहे.