नागपूर अमरावती महामार्गावर कोंढाळीजवळ ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
नागपूर-अमरावती महामार्गावर कोंढाळीजवळ ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला आहे.

कारमधील दोघांचा मृत्यू तर इतर दोघे गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
आज सकाळी नऊ वाजताच्या सुमारास अमरावतीवरुन नागपूरच्या दिशेने येणारी कार विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला जोरात धडकली आणि अपघात झाला.या अपघातात दोघांचा जागेवरच मृत्यू झाला असून इतर दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.नागपूर अमरावती महामार्गावर ज्या ठिकाणी अपघात झाला, त्या ठिकाणी महामार्ग फोर लेनचा आहे.मात्र एका बाजूच्या दोन लेनवर दुरुस्तीचे काम सुरु असल्यामुळे ते दोन्ही लेन बंद होत्या.इतर दोन लेन वरुन दोन्ही बाजूची वाहतूक सुरू होती. त्यामुळेच हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे.