वाघ, अस्वल व रानटी डुकरांच्या अवशेषाची तस्करी करणारा अटकेत

0
38

देवरी-तालुक्यातील पालांदूर जमीदार येथे दारू विक्री करणारा रवी बोडगेवार (अण्णा )याला वाघ, अस्वल व रानटी डुकराच्या अवशेषाची तस्करी प्रकरणी आज चीचगड वन विभाग व चिचगड पोलिसांनी अटक केलेली आहे. प्राप्त माहितीनुसार रवी बोडगेवार राहणार पालांदूर जमीनदार यांच्या घराची मिळालेल्या गुप्त माहितीनुसार व्याघ्र प्रकल्प नवेगाव नागझिरा चेअधिकारी तसेच पोलीस विभागाने आज रविवारला सकाळी पाच वाजता पासून त्याच्या घराची झडती केली असता त्यात वनविभाग व पोलिसांच्या हातात रवी बोडगेवार यांच्या घरातून बोरीत भरलेले २१ लाख रुपये अंदाजे, वाघाची दोन नखे, अस्वलाची पंजे व रानटी डुकराचे दात हे अवशेष मिळाले.
तसेच होळी निमित्ताने विक्री करण्यासाठी आणलेली २२ पेटी दारू पोलिसांच्या हाती लागली. रवी बोडगेवार याला पोलीस व वन विभागा ने ताब्यात घेतले असून वन्य प्राण्यांच्या अवशेषांची तस्करी मध्ये आणखी कोणते आरोपी त्याच्याशी जुळलेले आहेत याचा शोध घेणे सुरू आहे. या कारवाई दरम्यान देवरी चे पोलीस उपविभागीय अधिकारी संकेत देवडेकर चिचगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद पाटील व्याघ्र राखीव दलाचे वनपरिक्षेत्राधिकारी कौशिक, वनपरिक्षेत्राधिकारी डोंगरवार तसेच वनपाल प्यारेलाल उसेंडी व त्यांची चमू हजर होती. या प्रकरणात आणखी कुणाकुणाचे नाव समोर येतात याकडे नागरिकांचे लक्ष लागलेले आहेत.