39 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home विदर्भ ताडोबात वाघाचा मृतदेह आढळला

ताडोबात वाघाचा मृतदेह आढळला

0
40
file photo

blank

चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये रविवारी सायंकाळी पूर्ण वाढ झालेल्या वाघाचा मृतदेह आढळून आला. दोन वाघांमध्ये अधिवास क्षेत्रावरून झालेल्या झुंजीत या वाघाचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वनखात्याचा आहे.

अवघ्या दोन महिन्यांत चंद्रपूर जिल्ह्यात सहा वाघांचा मृत्यू झाला आहे. वनविभागाचे पथक गस्त करीत असताना ताडोबा बफर क्षेत्रातील चक निंबाळा गावाजवळ वाघाचा मृतदेह आढळून आला. मृत वाघाच्या शरीरावर अनेक जखमा होत्या. हा वाघ आधीपासून जखमी असावा, असेही सांगण्यात येत आहे. चौकशीच्या औपचारिकतेनंतर वाघाचा मृतदेह चंद्रपूर येथील उपचार केंद्रात (टीटीसी) आणण्यात आला. सोमवारी सकाळी टीटीसीमध्ये शवविच्छेदन करण्यात आले.

blank